मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
दुष्काळी भागात पाणी टंचाईमुळे शेतकरी अडचणीत येत आहेत.पिकांना पाणी मिळत नसल्यामुळे पिके जळून जात असल्यामुळे शेतकर्यांनी आता मत्स्य शेती करणे काळाची गरज असल्याचे मत उद्योजक आनंद ताड यांनी व्यक्त केले. ते लक्ष्य मंगल अँग्रो फार्म पाठखळ येथे बंदिस्तमत्स्य शेती प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
याप्रसंगी लक्ष्य मंगल अँग्रो फार्म महाराष्ट्रचे सहाय्यक अभियंता के.के.शिंदे, तज्ञ नेपाळचे ऐजाज अन्सारी,अभियंता राज पाटील,भारत ताड, सदाशिव माने,बिरुदेव कोळेकर, प्रवीण लेंडवे,दिनेश चव्हाण,नारायण गायकवाड, राहुल बुरुटे आदीजन उपस्थित होते.
ताड पुढे बोलताना म्हणाले की, मंगळवेढा तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून परिचित असून येथील शेतकर्यांनी व बेरोजगार युवकांनी बंदीस्त मत्स्य शेती केल्यास इतर पिकांच्या दुप्पट उत्पन्न त्यांना घेता येईल व आर्थिक उन्नती साधता येईल,असेही ते म्हणाले. येथे उत्पादीत होणार्या गोड्या पाण्यातील माशांना देश-विदेशात मोठी मागणी असून केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारकडून या उद्योगाला उभारी देण्यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. त्याचा लाभ मंगळवेढा तालुक्यातील शेतकर्यांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
मत्स्य शेतीस ६० टक्के अनुदान
मंगळवेढा तालुक्यातील पाठखळ येथील आनंद ताड यांच्या शेतात बायोफ्लॉक फिश फार्मिंग योजनेतून बंदीस्त मत्स्य पालनाचा महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प राबवण्यात आला आहे. या प्रकल्पामध्ये चिलापी, सिंधी,पाब्दा व देशी केवई या जातीच्या माशांचे संवर्धन करण्यात आले असून सदर योजनेसाठी शासनाकडून ६० टक्के अनुदान देण्यात येत आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज