
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । सोलापूर येथे राहत्या घरात लाकडी वाशाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन केकडे नगर येथील वृद्धाने आत्महत्या केली . सतय्या रामय्या संगा ( वय ७० , रा . गोकुळ नगर , गंगाआई केकडे नगर ) असे आत्महत्या केलेल्या वृद्वाचे नाव आहे.
गुरुवार २६ मार्च रोजी सकाळी राहत्या घरी ही घटना घडली . त्याला बेशुद्धावस्थेत उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले . पण डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मयत घोषित केले . त्यांच्या आत्महत्येचे कारण अजून स्पष्ट झाले नाही .



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












