मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
सोलापूर जिल्ह्यातील ज्या साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची ऊस बिले थकविली आहेत. ती तात्काळ देण्यात यावी. कामगारांचे थकीत वेतन त्वरित मिळावे अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दि.२४ जानेवारी रोजी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालय सोलापूर येथे धरणे आंदोलन करण्याचा इशारा प्रादेशिक साखर सहसंचालकांना देण्यात आलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष महामूद पटेल, युवा जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, प्रताप पिसाळ, शिवाजी सांवत, उमाशंकर पाटील उपस्थित होते. जिल्ह्यातील भीमा, विठ्ठल सहकारी, सहकार शिरोमणी भाळवणी या साखर कारखान्यांनी गाळप हंगाम २०१८ -१९ मधील ऊसाची बिले दिलेली नाहीत.
या कारखान्यातील कामगारांच्या पगारी १५ ते २० महिन्यापासून थकल्या आहेत. यासह जिल्ह्यातील इतर कारखान्याचे थकीत ऊस बिले त्वरित मिळावीत तसेच विजय शुगर (करकंब) या कारखान्याकडे २०१५-१६ व २०१६-१७ चे शेतकऱ्यांना थकीत ऊसबिले अद्याप दिलेली नाहीत.
सदर ऊसबिले व कामगारांच्या पगारी त्वरीत जमा कराव्या व विठ्ठलराव शिंदे कारखान्याने वगळलेल्या १८ सभासदांना कायम सभासद करुन घ्यावे, या मागणीसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटना प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालय सोलापूर येथे धरणे आंदोलन करणार आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज