मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकाराच्या दुस-या कार्यकाळात अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सादर केलेला पहिला अर्थसंकल्प ही निराशाजनक राहिला आहे, एक प्रकारे तो बुरे दिनचा पुरावाच आहे,यात मोठ्या घोषणा असल्या तरी त्यासाठी पुरेशी आर्थिक तरतूदच नाही,त्यामुळे देशातील जनतेचा भ्रमनिरास झाला आहे.
केंद्राय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना जनता नाराज आहे मत शिवबुध्दचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे यांनी म्हटले आहे, की केंद्र सरकार कडून नवीन वर्ष अर्थसंकल्प सादर होत असताना काहीतरी नवीन सुखद निर्णयाची भेट मिळले अशी सर्वसामान्यांची अपेक्षा होती,
मात्र तसे काही घडले नाही, आज देशातील भांडवली बाजार गडगडताना दिसला, भांडवली बाजाराचे सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक काही अंकांनी खाली आले आहेत,यावरून अर्थसंकल्प समाधानकारक नसल्याचे स्पष्ट होत आहे, अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा शेती,आरोग्य, शिक्षण, रोजगार, या म्हत्वाच्या क्षेत्रासाठी पुरेशी आर्थिक तरतूद केलेली दिसून आली,शेतक-यांचे उत्पन दुप्पट करणार असे सरकार सांगते, मात्र त्यासाठी कोणत्याही ठोस उपाययोजना याही अर्थसंकल्पात केलेल्या नाहीत असे ही शिवबुध्दचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे म्हटले आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज