मं. टा. वृत्तसेवा । दिल्ली । देशात शांतता आणि एकता गरजेची आहे. सबका साथ-सबका विकास करत असताना सबका विश्वासही महत्त्वाचा आहे. माझ्यासाठी सर्वात पहिलं माझा देश महत्त्वाचा आहे त्यानंतर पक्ष आहे असं त्यांनी सांगितले.तसेच देश सर्वोच्च आहे. विकास भाजपाचा मंत्र आहे. त्यासाठी शांतता आणि सद्भावना गरजेचे आहे. विकास पुढे घेऊन जायचा आहे. फक्त बोलू नका तर प्रत्येक खासदाराने शांतता, एकता आणि सद्भावना राखण्यासाठी पुढाकार घेण्यात यावा अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खासदारांना दिली.
दिल्ली हिंसाचारानंतर पहिल्यांदा २६ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावर भाष्य केलं होतं. तब्बल ६९ तासांनंतर आलेल्या या ट्विटमुळे पंतप्रधान मोदींवर विरोधकांनी टीकाही केली. लोकांना शांतता राखण्याचं आवाहन नरेंद्र मोदींनी केलं होतं. या ट्विटमध्ये म्हटलं होतं की, दिल्लीच्या विविध भागातील परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलीस आणि इतर यंत्रणा कार्यरत आहेत. त्यामुळे सर्वांनी शांतता व बंधुता टिकवून ठेवण्याचं काम करावं अशी विनंती त्यांनी केली होती.
दरम्यान, सोमवारी अचानक मोदींनी टि्वटर, फेसबुक, इन्स्टाग्राम व यूट्यूब या सोशल मीडियावरील माझी अकाउंट्स येत्या रविवारपासून बंद करण्याचा विचार करत आहे. याविषयी पुढील माहिती नंतर देईन असं म्हटलं, त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज