मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. याकाळात जिल्ह्यात अन्नधान्य आणि जीवनावश्यक बाबींचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्हास्तरीय अन्नधान्य वितरण नियंत्रण समिती स्थापन केली आहे. समितीने शहर हद्दीत गर्दी होऊ नये, जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी होऊ न देणे यांचा आढावा घेऊन लोकांपर्यंत अन्न-धान्याचा पुरवठा होत असल्याची खात्री करावी. अन्नधान्य वितरण अधिकारी यांच्याशी समन्वय ठेवून योग्य कार्यवाही करावी, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
समितीची रचना : अध्यक्ष – अन्नधान्य वितरण अधिकारी, सचिव -उपनिबंधक सहकारी संस्था, सोलापूर शहर, सदस्य – उपविभागीय कृषी अधिकारी, विभागीय अधिकारी, सोलापूर महानगरपालिका, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, समन्वय अधिकारी, पेट्रोल कंपनी, अध्यक्ष, गॅस वितरक संघ, अध्यक्ष, पेट्रोल-डिझेल संघ, अध्यक्ष, भुसारी व्यापारी संघ.तालुकास्तरावर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय अन्नधान्य वितरण नियंत्रण समिती नियुक्ती करण्यात आली आहे.
या समितीत गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, सहायक निबंधक, सहकारी संस्था, अध्यक्ष, गॅस वितरण संघटना, कृषी उत्पन्न बाजार समिती. या समितीचे सदस्य सचिव म्हणून नगर परिषदेचे मुख्याधिकारी आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज