mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शिक्षकांना जूनी पेन्शन मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : संभाजीराव थोरात

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized



मंगळवेढा : समाधान फुगारे

मंगळवेढा १ नोव्हेंबर २००५ नंतर लागलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात यांनी व्यक्त केले.

मंगळवेढा तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या आचार्य दादासाहेब दोंदे जिल्हास्तरीय आदर्श पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर प्रमुख व्याख्याते विद्या प्रतिष्ठानचे प्रा.राजकुमार कदम,नगराध्यक्षा अरूणा माळी,नियोजन समितीचे सदस्य अजित जगताप, भगीरथ भालके,प्रशासनाधिकारी शाहू सतपाल,लतीफ तांबोळी, मच्छिंद्रनाथ मोरे,बब्रुवाहन काशिद,चंदाराणी आतकर,अरूण डोरले,संजय चेळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, शिक्षकांना बी.एल.ओ. सारखी अशैक्षणिक कामे लावण्यात येऊ नयेत त्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेवर विपरित परिणाम होत आहे.यासारख्या शिक्षकांच्या अन्य प्रश्नांच्या संदर्भात फेब्रुवारी महिन्यात शिक्षक संघाचे राज्य अधिवेशन अलिबाग येथे आयोजित केले असून त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी प्रमुख व्याख्याते बारामती विद्या प्रतिष्ठानचे प्रा.राजकुमार कदम यांनी आपल्या व्याख्यानामध्ये   ज्या शिक्षकांकडून प्रामाणिकपणे आदर्श विद्यार्थी घडवले जातात त्यांची मुलेही समाजात आदर्श घडत असतात मात्र जे स्वतःच्या कामाशी प्रामाणिक नसतात शाळेत ज्ञानदानाचे काम प्रामाणिक करत नाही त्यांच्या घरातीलही वातावरण बिघडते हा निसर्ग नियम आहे ‘पेराल तेच उगवेल’म्हणून प्रामाणिकपणे काम करून आदर्श विद्यार्थी घडवत राष्ट्राच्या जडणघडणीत सामील व्हा असे आवाहन त्यांनी केले.

सदर प्रसंगी नगराध्यक्षा अरूणा माळी,जिल्हा नियोजन समिती सदस्य अजित जगताप,भगीरथ भालके,राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेल जिल्हाध्यक्ष लतीफ तांबोळी, गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख,जिल्हाध्यक्ष म.ज. मोरे,आदर्श शिक्षक भुजंगराव खटकाळे आदि मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. 

  आचार्य दादासाहेब दोंदे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त जिल्हास्तरीय आचार्य दादासाहेब दोंदे आदर्श शिक्षक,आदर्श शाळा,आदर्श पत्रकारिता,आदर्श गटशिक्षणाधिकारी,आदर्श विस्ताराधिकारी,आदर्श केंद्रप्रमुख,आचार्य दोंदे जीवनगौरव पुरस्कार वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय चेळेकर यांनी तर सूत्रसंचालन भारत शिंदे, भागवत तानगावडे, श्रीनिवास माळी व मोहन लेंडवे यांनी केले.आभार संभाजी तानगावडे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक संघाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

जीवनगौरव पुरस्कार:शिवाजी पाटील (ब्रम्हपुरी),

आदर्श पत्रकारिता:दत्तात्रय नवत्रे (दै.पुण्यनगरी),

आदर्श गटशिक्षणाधिकारी:धनंजय देशमुख(माळशिरस),

आदर्श विस्ताराधिकारी:विकास यादव (मोहोळ),

आदर्श केंद्रप्रमुख:खातुनबी आतार(माढा)

आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक (शाळा):-भुजंगराव खटकाळे(धर्मगांव), राजशेखर कोष्टी(बेदरेवस्ती),सायाप्पा कुंभार(मातुर्लिंगवस्ती),विद्या पाटील(मरवडे,मुले),चंद्रकांत डांगे (हुलजंती),शिवाजी भुसनर(बंडगरवस्ती),छाया कांबळे(मोरेवाडी),युवराज सावंत(घाडगेवाडी),सुर्यकांत पाटील(नंदेश्वर),अरुणा अंकोलीकर(खोलवाडी), प्रविण शिवशरण(बावची), पांडुरंग मासाळ(चौगुलेवस्ती),दिगंबर बनसोडे(लक्ष्मी दहिवडी),गोपाळ लेंडवे (पौट),भारती नागणे (न.पा. मंगळवेढा),कैलास हेगडे(इंग्लिश स्कूल,मंगळवेढा),आण्णा सुरवसे(मोहोळ),अनिता घुले(बार्शी),गजानन मिराशे (अक्कलकोट),नितीन पाटील(पंढरपूर),सोपान मोहिते(माढा),वैशाली शिवगुंडे(उ.सोलापूर),शितल शिंदे(माळशिरस),शोभा निकम(करमाळा),रतन कोळेकर(सांगोला),प्रमोद कस्तुरे(द.सोलापूर),

आदर्श शाळा:शिरसी,भालेवाडी,घरनिकी,शिवणगी

(मंगळवेढा),खांडेकरवाडी(सांगोला),शिरापूर(मोहोळ),शेंद्री(बार्शी),तिल्हेहाळ(द.सोलापूर),चिक्केहळ्ळी(अक्कलकोट),खरसोळी(पंढरपूर),उजनी(माढा),सोरेगाव(उ.सोलापूर),पानीव(माळशिरस),अंजनडोह(करमाळा)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: MangalWedhaSamajik

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
सोलापुरात वीज चोरी करणाऱ्यांमध्ये खळबळ ११५७ वीजचोरांवर झाली कारवाई

सोलापुरात वीज चोरी करणाऱ्यांमध्ये खळबळ ११५७ वीजचोरांवर झाली कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजमाता अर्बन बँक रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; दामाजी चौकात बँकेची 24 तास ATM सेवा सुरू

मंगळवेढ्यात ‘राजमाता बँकेचा’ उद्या वर्धापनदिन; गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चहापानाचे आयोजन

March 18, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

​पोलिसांचा आशीर्वाद की यंत्रणेचा सुस्तपणा? गुन्हा दाखल असलेले ‘ते’ १० विद्यार्थी अजूनही मोकाटच; मनसेचा पोलीस महानिरीक्षकांना सवाल

March 18, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

मंगळवेढा हादरलं! चाकूचा धाक दाखवून भरवस्तीत घरफोडी; सव्वा लाखांचा मुद्देमाल लंपास; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

March 18, 2026
दक्षिण भागात म्हैसाळचे पाणी “टेल टू हेड” मिळणेसाठी आ.आवताडे यांची विधानसभेत मागणी; देवेंद्र फडणवीस यांचे सकारात्मक उत्तर

नदी वाचवा, निधी द्या! भीमेच्या शुद्धीकरणासाठी १०० कोटी द्या; आमदार आवताडेंची सरकारकडे आग्रही मागणी; विधानसभेत घुमवला आवाज

March 17, 2026
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

मोठी बातमी! ​गरीबांच्या हक्काच्या पैशावर डल्ला; लाचखोर ग्रामपंचायत कर्मचारी अटकेत

March 17, 2026
कामाची बातमी! मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया उपचार सुरू

मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त भव्य आरोग्य शिबीर: मोफत तपासणी आणि उपचारांची सुवर्णसंधी

March 17, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा