मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । सोलापूर झेडपीच्या सात शिक्षकांनी बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे . या शिक्षकांची विभागीय चौकशी सुरू असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांनी दिली . बोगस पदव्या सादर करून पदोन्नती घेतल्याचा विषय चांगलाच गाजला होता . या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
आतापर्यंत पंधरा कर्मचाऱ्यांनी ड्युटी करीत कॉलेजला उपस्थित न राहताच अशी बोगस पदवी संपादन करून प्रमाणपत्र सादर केल्याचे चौकशीत उघड झाल्याचे कार्यकारी अभियंता कदम यांनी सर्वसाधरण सभेत सांगितले आहे . चौकशी समिती या प्रकरणाची अजून चौकशी करीत आहे . विधानसभेपर्यंत हे प्रकरण गेलेले असतानाच आता शिक्षकांच्या बोगस प्रमाणपत्राचा विषय पुन्हा चर्चेला आला.
सात शिक्षकांनी बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केल्याची तक्रार आहे . या तक्रारीची विभागीय आयुक्तांनी गंभीर दखल घेतली असून आता या शिक्षकांची विभागीय चौकशी करण्यात येत आहे . मुख्याध्यापकपदी पदोन्नती मिळविण्यासाठी काही शिक्षकांची बहिरे असल्याचे प्रमाणपत्र मिळविले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज