मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । इस्लामपूर येथील आणखी एकास कोरोनाची बाधा झाल्याचे रविवारी स्पष्ट झाले . हा रुग्ण त्याच कुटुंबातील दोन वर्षांचा लहान मुलगा असल्याचे समजते , तर दोघांचे स्वब निगेटिव्ह आले आहेत , अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी यांनी दिली.
जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या २४ झाली आहे . सांगली जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण मंगळवार , दि . २४ रोजी सापडले.इस्लामपूर येथील एकाच कुटुंबातील चौघांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्याने सर्वत्र खळबळ उडाली. यानंतर या चारजणांशी संबंधित ३९ लोकांना तातडीने अलगीकरण कक्षात ठेवले होते .
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज