मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । सोलापूर लोकसभेतून बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे निवडून आलेले भाजप खासदार डॉ. शिवाचार्य यांना मुंबई उच्च न्यायालयाने तूर्तास दिलासा दिला आहे.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे, बहुजन विकास आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर यांचा पराभव करून भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी तथा नूरदय्यास्वामी गुरुबसप्पा हिरेमठ विजयी झाले होते. खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या शाळेच्या दाखल्यावर हिंदू लिंगायत असा उल्लेख असून त्यांनी बेडा जंगम जातीचा बनावट दाखला तयार केला आहे असा आरोप करत अपक्ष उमेदवार व माजी महापौर प्रमोद गायकवाड यांनी सोलापूर जिल्हा जात पडताळणी समितीकडे तक्रार केली.
त्यावर डॉ. शिवाचार्य यांनी जातवैधता समितीकडे अपील केले होते. जात पडताळणी समितीने डॉ. शिवाचार्य यांनी जोडलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी दक्षता समिती नियुक्त केली. या समितीने ठिकठिकाणी जाऊन कागदपत्रांची माहिती घेतली. त्यावेळी डॉ. शिवाचार्य यांचे जात प्रमाणपत्र बोगस असल्याचे आढळून आले. त्यानुसार जात पडताळणी समितीने ते रद्द केले तसेच तहसीलदारांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. या निर्णयाविरोधात डॉ. शिवाचार्य यांनी ऍड. संतोष न्हावकर यांच्या वतीने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज न्यायमूर्ती के. के. तातेड आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज