मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
जिल्हा परिषदेच्या चार विषय समित्यांच्या सभापती निवडीसाठी आज मंगळवार, 14 जानेवारी रोजी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव सभागृहात विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे.
जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
नुकत्याच झालेल्या निवडीत बंडखोरीने सेनेचा अध्यक्ष, तर उपाध्यक्ष अपक्ष झाला आहे. त्यामुळे आता चार सभापती कोणत्या पक्षातील असणार याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.
जि.प. कृषी व पशुसंवर्धन, शिक्षण आरोग्य, अर्थ व बांधकाम, समाजकल्याण, महिला व बालकल्याण या समित्यांच्या सभापतींची निवड यावेळी करण्यात येणार आहे. जि.प. अध्यक्ष हे सर्वसाधारण सभा, स्थायी व जलसंधारण समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात.
त्यामुळे या समित्या अध्यक्षांकडे असतात. उपाध्यक्ष यांच्याकडे अर्थ व बांधकाम किंवा शिक्षण व आरोग्य या समितीची सभापतिपदे देण्याचा संकेत आहे. हा नियम या निवडीत पाळला जाणार का, याचीही उत्सुकता निर्माण झाली आहे. उपाध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी अर्थ व बांधकाम समितीसाठी आग्रह धरला आहे. त्यामुळे त्यांना हे खाते मिळणार का, याचीही उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘महाविकास आघाडी’ची राज्यात सत्ता आहे.
त्यामुळे जिल्हा परिषदेतही ‘महाविकास आघाडी’ची सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना या तीनही पक्षांकडून करण्यात येत आहे. जि.प. अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी हा प्रयोग करण्यात आला. मात्र मंगळवेढा तालुक्यातील आवताडे गट ऐनवेळी भाजप पुरस्कृत समविचारी गटाकडे गेला शिवाय माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादीच्या सहा सदस्यांनी राष्ट्रवादीविरोधात मतदान केल्याने ‘महाविकास आघाडी’चा प्रयोग सपशेल अपयशी ठरला आहे.
सोमवारी सायंकाळी जिल्हाधिकार्यांनी सहा सदस्यांना अपात्र ठरविण्याचा आदेश दिला, तर त्यांना विभागीय आयुक्त यांच्याकडे अपील करण्यासाठी वेळच मिळणार नाही. मंगळवारी दुपारी दोन वाजता सभापती निवडीच्या सभा असल्याने यावेळेपर्यंत जर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला स्थगिती न मिळाल्यास सहा सदस्यांना मतदान प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही. त्यामुळे सभापती निवडी समविचारी पक्षांसाठी आव्हानाचे ठरत आहे. समविचारी पक्षाने स्थापन केलेल्या सत्तेत भाजप सदस्यांनी कोणतीही पदे न घेण्याची भूमिका माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी घेतली आहे. त्यामुळे भाजप सदस्यांचीही नाराजी ओढावली गेली आहे. काँग्रेसच्या सदस्यांचाही काहीच नेम नसल्याने ऐनवेळी सभेत कोण कोणाच्या बाजूने उभे राहणार याबाबत चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे.
सभापतिपदे दोन राखीव, तर दोन अराखीव
जि.प. सभापती निवडीसाठी मंगळवारी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव सभागृहात दोन वाजता विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. तत्पूर्वी सकाळी दहा ते बारा यावेळेत या पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे. सभापतिपदाची दोन पदे सर्वसाधारण असून दोन राखीव आहेत. महिला व बालकल्याण समितीचे सभापतीपद हे फक्त महिलांना, तर समाजकल्याण समितीचे सभापतीपद हे मागासवर्गीय सदस्यांना राखीव आहे. दोन सर्वसाधारण सभापतींना कृषी व पशुसंवर्धन, अर्थ व बांधकाम, शिक्षण व आरोग्य यापैकी कोणत्याही दोन समित्यांचे सभापती होता येणार आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज