मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
परीक्षेत कमी गुण मिळाल्याने व वर्गात गोंधळ घातल्याने शिक्षकांनी मारहाण केली . त्यामुळे आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या १३ वर्षीय विद्यार्थिनीने विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला .
ही घटना गुरसाळे ( ता .पंढरपूर ) येथे घडली आहे . विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीनुसार पंढरपूर तालुका पोलिसांनी संबंधित शाळेतील दोघा शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे .
गुरसाळे येथील श्री विठ्ठल प्रशालेतील विद्यार्थिनीला परीक्षेत कमी गुण मिळाले होते . त्यामुळे तिला शिक्षक डोंगरे व सय्यद यांनी रागावले . होते . शिवाय वर्गातही नेहमीच गोंधळ घालते म्हणून त्या दोघा शिक्षकांनी त्या विद्यार्थिनीला मारहाण केली . शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांसमोर मारहाण केल्याने अपमानास्पद वाटले होते .
त्यामुळे ६ फेब्रुवारी रोजी शाळा सुटल्यानंतर घरी आल्यावर विद्यार्थिनीने पीक फवारणीचे विषारी औषध प्राशन केले . हे घरच्यांच्या लक्षात आले . तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले . याबाबत तिच्याकडे विचारपूस केल्यानंतर तिने घडलेला प्रकार सांगितला .
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज