मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोरोना व्हायरसचा सोलापूरकरांनी चांगलाच धसका घेतल्याचे दिसत असून, त्याचा परिणाम मास्क व सॅनिटायझर विक्रीवर झाला आहे. शहरातील औषधविक्रीच्या दुकानांमध्ये मास्क, हॅण्डवॉश, सॅनिटायझर यांची विक्री वाढली आहे. याचा परिणाम या वस्तूंंच्या साठ्यांवर झाला आहे.
काही दिवसांपूर्वी संसर्गजन्य आजार असलेले रुग्ण व आॅपरेशन थिएटरमधील डॉक्टर हेच मास्क वापरत होते. त्यातच गुरुवारी सोलापुरात कोरोना आजाराचा रुग्ण आढळल्याची चर्चा झाली़ सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाल्यामुळे काल(गुरुवार)पासून मास्क व सॅनिटायझरच्या विक्रीत प्रचंड वाढ झाली आहे. मास्कमध्ये अनेक प्रकार असून, त्याची पाच ते १५ रुपयांपर्यंत विक्री होत आहे. वॉशेबल मास्क हे ५० रुपयांना विकले जात आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज