मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
सौ सुवर्णा अशोक चेळेकर,उपाध्यक्ष,सोलापूर जिल्हा काँग्रेस आय यांना दिनांक 2 फेब्रुवारी 2020 रोजी अगस्ती आश्रम, आळंदी देवाची पुणे येथे यशवंती प्रेरणादायी आधार सामाजिक संस्थेच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय महिला समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या संस्थेच्या वतीने प्रत्येक वर्षी सामाजिक,शैक्षणिक, कला, पत्रकारिता,उद्योजक, सांस्कृतिक इ क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्ती ना पुरस्कार वितरित केला जातो.
या कार्यक्रमाचे मा राणीताई पाटील,प्रवक्ता, लेकवाचवा अभियान महाराष्ट्र राज्य यांनी उद्घाटन केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ तुकाराम मोरे मा कुलगुरू महात्मा फुले कृषीविद्यापीठ राहुरी हे होते,परमु पाहुणे म्हणून डॉ विवेक मुळगीकर,डॉ प्रकाश तुरबतमठ,डॉ अपर्णा शिंदे उपस्थित होते.
सौ. सुवर्णा अशोक चेळेकर यांना राज्यस्तरीय महिला समाजरत्न पुरस्कार मिळाले बद्दल त्यांचे मा. सुशीलकुमार शिंदे,माजी मुख्यमंत्री,मा.भारत भालके,आमदार,पंढरपूर मा.उज्जवलाताई शिंदे,अध्यक्ष, जाई जुई विचारमंच,मा प्रणितीताई शिंदे, आमदार यांनी अभिनंदन केले.सौ सुवर्णा अशोक चेळेकर यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज