mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

भावजीने केला वहिनीचा मानसीक छळ मग पुढे घडले धक्कादायक

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
भावजीने केला वहिनीचा मानसीक छळ मग पुढे घडले धक्कादायक


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । वेताळ-बांबर्डे येथील विवाहिता स्वराली साईप्रसाद चव्हाण (२३) हिने सासरी होणाऱ्या दिराच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली असल्याची तक्रार तिच्या वडिलांनी दिली असून या प्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात मृत स्वरालीचा मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिचा दिर इंद्रजित चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत स्वरालीचे वडील मनोहर मुणगेकर (रा. देवगड) यांनी पोलिसांत तक्रार दिली की, त्यांच्या मुलीचे २३ डिसेंबर २०१८ रोजी वेताळ-बांबर्डे येथील साईप्रसाद चव्हाण यांच्यासोबत लग्न झाले होते. साईप्रसाद हा गोवा येथे खासगी नोकरी करीत होता.

दरम्यान स्वराली ही आजारी असल्याने साईप्रसादने गोवा येथील नोकरी सोडून कुडाळ शहरात नोकरी पत्करली. वेताळ-बांबर्डे येथे स्वराली साईप्रसाद, सासरे तानाजी चव्हाण, सासु आनंदी चव्हाण व दिर इंद्रजित चव्हाण यांच्यासह एकत्र रहायची. आजारपणानंतर तिच्यावर मुंबईत उपचार केल्यानंतर ती बरी झाली होती.

मात्र डिसेंबर २०१९ ते जानेवारी या कालावधीत स्वरालीचा दीर इंद्रजीत हा तिला आजारी असण्यावरून सारखा बोलायचा, शिवीगाळ करून मानसिक छळ करीत असे. स्वरालीने आम्हांला देवगड येथे आल्यानंतर या बाबतची माहिती दिली होती.

या संदर्भात तिचा पती साईप्रसादला कल्पना दिली होती. त्यानंतर ९ मार्च २०१९ रोजी वेताळबांबर्डे येथील घरी असताना स्वरालीला तुला कामे करता येत नाही असे सांगत इंद्रजित याने सांगत शिविगाळ केली व कोयता मारण्याकरिता तिच्या मागे लागला होता.

याची माहिती स्वरालीने दिल्यानंतर ११ मार्च रोजी तिला देवगड येथे घेवून जात असताना तिने आचरा येथे तिच्या आईसाठी एका प्लास्टिक बाटलीत उसाचा रस घेतला होता. देवगड येथील घरी आल्यानंतर दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास तिने उंदीर मारण्याचे औषध उसाच्या रसात मिसळून ते विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

त्यामुळे तिला उपचारासाठी ओरोस येथील जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र १७ मार्च रोजी तिचा मृत्यू झाला. अशी माहिती मुणगेकर यांनी तक्रारीत दिली असून या प्रकरणी स्वरालीला शिविगाळ व तिचा मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिचा दिर इंद्रजित याच्यावर कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी कुडाळ पोलीस अधिक तपास करीत आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Maharashtra MazaRecent News

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण लंपास

महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Breaking! मंगळवेढ्याच्या दोन ‘नायब तहसीलदारां’ची तहसीलदार पदावर पदोन्नती

खड्डा खोदून पूजाविधीचा प्रकार; मंगळवेढ्यात भीतीचे वातावरण; नरबळीच्या अफवेने परिसरात खळबळ; पोलिसांचा मोठा खुलासा

April 1, 2026
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण

मंगळवेढ्यात भाजप महिला मोर्चाचे रणशिंग; तालुका कार्यकारिणी जाहीर; पक्ष बळकटीकरणाचा निर्धार; आशा पाटील यांनी केली निवडीची अधिकृत घोषणा

April 1, 2026
मंगळवेढ्यात विद्यार्थ्यांसाठी ‘सुवर्णसंधी’! एका कोर्सच्या फीमध्ये दुसरा कोर्स मोफत; ACTI कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटची ऑफर; महिला दिनानिमित्त मुलींना विशेष सवलत

बांधकाम कामगारच्या मुलांना कॉप्युटर कोर्स नंतर मिळणार, ‘एवढे’ रुपये; आम्ही फक्त AI वापरण्यापुरते शिकवत नाही; AI तयार करायला शिकवतो; आता मंगळवेढा व नंदेश्वर मध्ये ACTI

April 1, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

भरदिवसा धाडसी चोरी! ​मंगळवेढा एसटी स्टँडवर गर्दीचा फायदा; बसमध्ये चढताना महिलेचे ६० हजारांचे गंठण चोरीला

April 1, 2026
मरवडे-चडचण रोडवर अपघात; एका कामगाराचा मृत्यू,महिला गंभीर जखमी

धक्कादायक! लग्नाच्या गाठी बांधण्यापूर्वीच काळाचा घाला; देवदर्शनाला निघालेल्या तरुणीचा मंगळवेढ्यात अपघातात अंत; होणारा पती जखमी

March 31, 2026
​’साप्ताहिक रणयुग टाईम्स’चा १४ वा वर्धापन दिन: मंगळवेढ्यात कर्तृत्ववानांचा होणार सन्मान; संपादक प्रमोद बिनवडे यांची माहिती

​हार-तुरे नकोत, वही-पेन हवे! अनाथ व गरजूंच्या शिक्षणासाठी संपादक प्रमोद बिनवडे यांचे भावनिक आवाहन

March 31, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा