मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । श्री संत दामाजी महाविद्यालयात बी कॉम भाग ३ मध्ये शिकत असलेल्या अक्षय अविनाश खंकाळ या विद्यार्थ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी महाविद्यालयाकडून दहा हजार रुपयाची मदत करण्यात आली सदरच्या रकमेचा धनादेश विद्यार्थ्याचे वडील अविनाश खंकाळ व चुलते अमोल खंकाळ यांच्याकडे प्राचार्य डॉ एन बी पवार व उपप्राचार्य प्रा सदाशिव कोकरे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.
सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज शासकिय रूग्णालय येथे सदरच्या विद्यार्थ्याच्या आतड्याच्या छिद्राची शस्त्रक्रिया करण्यात आली असून सदर शस्त्रक्रियेसाठी मोठा खर्च आला असून विद्यार्थ्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन एक हात मदतीचा म्हणून महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक पुढे आले आहेत विद्यार्थी हा महाविद्यालयाचा केंद्रबींदू आहे विद्यार्थांना ज्ञान देण्याबरोबरच या अगोदरही महाविद्यालयाने गरीब विद्यार्थ्यांना संकाटाच्या प्रसंगी आर्थिक मदतीचा आधार देऊन माणूसकीरूपी संस्कार जपलेला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज