मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
चीनमध्ये गेली पंधरा दिवस झाले सातारा शहरातील रहिवासी असलेल्या अश्विनी पाटील ह्या चीन मधील वुहानमध्ये अडकून पडलेल्या आहेत. त्यांनी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना व्हिडिओ कॉल द्वारे संपर्क साधला होता. माजी मुख्यमंत्री यांनी भारत सरकारच्या विदेश मंत्रलयाच्या मदतीने चीनला पत्र पाठवले व सातारा शहरातील अश्विनी पाटीलला मदत केली. त्यानुसार भारतातून चीनला भारतीय वायु सेनेचे विमान गेले आहे. ते विमान चीन सरकारने रोखून ठेवले आहे.
करोना ग्रस्त असलेल्या अश्विनी पाटील ह्या चीन मधील वुहान शहरात अडकल्याचे वृत्त ए. एम न्यूजने प्रसारित करून अश्विनी पाटील यांच्याशी संपर्क साधला होता.
या वृत्ताची दखल भारत सरकारने घेतली व चीनमध्ये अडकलेल्या करोनाग्रस्तानां आणण्यासाठी भारतीय वायुसेनचे विमान चीनमध्ये पोहचणार असल्याचे अश्विनी पाटीलचे वडील अविनाश पाटील यांनी ए एम न्यूज ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. सातारा येथे राहत असलेल्या अश्विनी पाटील यांच्या आई वडीलानां अश्विनी कधी मायदेशी परतले असे झाले असून ते आपली मुलगी अश्विनीच्या व्हिडिओ कॉल द्वारे संपर्कांत आहेत. पण भारतातुन चीनला गेलेले विमान अजून पोहचले नसल्याने अश्विनी पाटील यांच्या घरच्यांना काळजी लागली आहे

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज