मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । शंकर सहकारी साखर कारखान्यावर अध्यक्ष असलेल्या माजी खा. रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या साखर कारखान्यावर प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाने आरआरसीची धाडसी कारवाई करून सात संचालकांना अपात्र ठरविले आहे. या कारवाईने मोहिते-पाटील गटाला मोठा धक्का बसला आहे.
शंकर साखर कारखान्याने उपविधी व सहकार कायद्याचा भंग केल्याप्रकरणी प्रादेशिक साखर सहसंचालक राजेंद्रकुमार दराडे यांनी ही कारवाई केली आहे. चंद्रकांत शिंदे, संजय कोरटकर, दत्तू वाघमोडे, इस्लामपूर गटाचे संचालक अमित माने, बोरगाव गटाचे संचालक भगवान मिसाळ, दत्तात्रय चव्हाण व इतर मागासवर्गीय गटाचे संचालक शिवाजी गोरे या सात संचालकांवर अपात्रतेची कारवाई केली आहे.
साखर सहसंचालक कार्यालयाने याप्रकरणी संबंधित संचालकांना नोटीस देऊन सुनावणीही घेतली. सुनावणीनंतर सात संचालकांवर अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, या कारवाईमुळे मोहिते- पाटील गटाला मोठा धक्का बसला आहे. सभासद असूनही साखर कारखान्याला ऊस पुरवठा केला नसल्यामुळे ही कारवाई केली आहे. मात्र, जिल्ह्यामध्ये अशा अनेक साखर कारखान्यांच्या सभासदांकडून ऊस पुरवठा केला जात नाही. तरीही ते संचालक पदावर कायम आहेत. मात्र, त्यासाठी तक्रारदार समोर येत नाहीत. तक्रार आली तरच कारवाई करता येत असल्याने साखर सहसंचालकांचे हात बांधले गेले आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज