mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर: भाजप खासदार जयसिद्देश्वर शिवाचार्य यांना नोटीस; लोकसभा निवडणुकीवेळी बनावट जातप्रमाणपत्र सादर केल्याचे प्रकरण

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
सोलापूर: भाजप खासदार जयसिद्देश्वर शिवाचार्य यांना नोटीस; लोकसभा निवडणुकीवेळी बनावट जातप्रमाणपत्र सादर केल्याचे प्रकरण

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

सोलापूरचे (Solapur) भाजप (BJP) खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी तथा नुरदय्यास्वामी गुरुबसप्पा हिरेमठ यांना बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणी नोटीस पाठविण्यात आली आहे. सोलापूर जिल्हा जात पहाणी आणि पडताळणी समिती द्वारा ही नोटीस खासदार. डॉ. जयसिद्देश्वर महास्वामी (Mahaswamiji, Dr. Jaisiddeshwar Shivacharya) यांना पाठविण्यात आली आहे. लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Elections 2019 ) मध्ये डॉ. जयसिद्देश्वर महास्वामी हे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार होते. निवडणूक आयोगाकडे उमेदवारी अर्ज दाखल करताना डॉ. जयसिद्देश्वर महास्वामी यांनी बनावट जात प्रमाणत जोडल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

या प्रकरणी रिपाइंचे प्रमोद गायकवाड यांनी आगोदर सोलापूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे तक्रार आणि त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) याचिका दाखल केली होती.

दरम्यान, एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, सोलापूर जिल्हा जात पडताळणी, पाहणी समितीने खासदार डॉ. जयसिद्देश्वर महास्वामी यांना नोटीस बजावली आहे. या नोटीशीमध्ये आपल्या प्रमाणपत्राची सत्यता दिलेल्या मुदतीत पटवून द्यावी असे बजावण्यात आले आहे. त्यामुळे समितीच्या नोटीशीला खासदार महोदय कसे उत्तर देतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

तक्रारकर्ते प्रमोद गायकवाड यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी तथा नुरदय्यास्वामी गुरुबसप्पा हिरेमठ यांचा बेडा जंगम जातीचा दाखला बनावट आहे. त्यांच्या शाळेच्या दाखल्यावर हिंदू लिंगायत असा उल्लख असल्याचा दावाही तक्रारकर्त्यांनी केला आहे.

मुंबई उच्च न्यायालयात प्रमोद गायकडवाड यांनी दाखल केलेल्या याचिकेत सोलापूर जिल्हाधिकारी, अक्कलकोट तहसीलदार, जात पडताळणी समिती सोलापूर, निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांचा देखील समावेश आहे. ही याचिका दाखल करुन घेतल्यावर मुंबई उच्च न्यायालयाने प्रतिवादींना नोटीस पाठवण्याचे निर्देश दिले. तसेच, प्रतिवादींना 5 नोव्हेंबरपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देशही दिले. ( सोलापूर लोकसभा मतदारसंघ 2019 निवडणूक निकाल: सोलापूर मतदारसंघात रंगतोय काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे, भाजपचे जयसिद्धेश्वर स्वामी आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर असा तिरंगी सामना)

या प्रकरणाची पार्श्वभूमी पाहिली तर, भाजप उमेदवार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी तथा नुरदय्यास्वामी गुरुबसप्पा हिरेमठ यांच्या उमेदवारीवर अपक्ष उमेदवार प्रमोद गायकवाड यांनी हरकत घेतली. मात्र, ही हरकत विचारात न घेता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जयसिद्धेश्वर महास्वामींचा अर्ज वैध ठरवला. सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव होता. त्यामुळे बेडा जंगम जातीचा दाखला सादर करत उमेदवार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी तथा नुरदय्यास्वामी गुरुबसप्पा हिरेमठ यांनी आपली उमेदवारी दाखल केली. मात्र, जातीच्या दाखल्यावर आक्षेप घेत गायकवाड यांनी न्यायालयाकडे याचिका दाखल केली.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
महाराष्ट्रातील मतदारांना मतपत्रिकेचा पर्याय मिळणार? विधानसभेच्या अध्यक्षांनी दिल्या महत्वाच्या सूचना

पोटनिवडणुकीची फेर मतमोजणी करा;शैला गोडसे, सचिन शिंदे, सिद्धेश्‍वर आवताडेसह राष्ट्रवादीची मागणी

May 17, 2021
Next Post
अनैतिक संबंधातून पत्नीच्या प्रियकराचा पतीकडून खून

अनैतिक संबंधातून पत्नीच्या प्रियकराचा पतीकडून खून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर! चोरीच्या संशयावरून झाडाला उलटं लटकवून जमावानं केला तरूणाचा खून

कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात लाकडी बांबूने घाव घालून केला खून; पती दोन मुलांसह पसार; दांपत्य मंगळवेढा तालुक्यातील

June 26, 2025
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

खळबळ! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच केले कृत्य

June 26, 2025
माझ्या मरणास प्रशासन कारणीभूत! बठाण, उचेठाण अवैध वाळू उपसा प्रशासनाच्या नाकावर टिचून सुरू; ठेक्यावर कारवाई का होत नाही?; सामाजिक कार्यकर्तेने दिला आत्मदहनाचा इशारा

जप्त केलेल्या वाळू साठ्यामधून मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावातील घरकूल धारकांना मोफत प्रती पाच ब्रास वाळू वाटप

June 26, 2025
वाहतूक पोलिसाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

धक्कादायक! शेव करताना गॅसचा स्फोट, २ चिमुकल्या बहिणींचा मृत्यू, आई वडिलांसह ४ गंभीर जखमी; मंगळवेढा तालुक्यातील घटना

June 26, 2025
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! इतिहासात प्रथमच आता लवकरच महागड्या वीजेपासून होणार सुटका; कोणाला होणार फायदा?

June 26, 2025
दामाजी महाविद्यालय, इंग्लिश स्कूलची यशाची परंपरा कायम, प्राची ओमने व निकिता आवताडे तालुक्यात प्रथम; मंगळवेढ्याचा निकाल १२ टक्क्याने घसरला, यंदा ८५.८४ टक्के उत्तीर्ण

लाखो विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट! दहावीची परीक्षा 2026 पासून दोनवेळा घेणार; नव्या नियमांना मंजुरी

June 25, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा