मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
सोलापूर जिल्हा कार्यक्षेत्रामध्ये ९ हजार ४२१ इतके हातपंप कार्यरत आहेत. या हातपंप दुरुस्तीसाठी वेगाने ग्रामीण भागात दुरुस्ती पथकाला पोहचता येण्यासाठी जिल्हा परिषदेने देखभाल दुरुस्ती निधीतून महिंद्रा कॅम्पर कंपनीच्या सात गाड्या खरेदी केल्या आहेत. सात तालुक्यांतील हातपंप दुरुस्तीची वाहने कालबाह्य झाली होती. त्यामुळे हातपंप दुरूस्ती कामात अडचणी निर्माण होत होत्या.
जुन्या वाहनांऐवजी नवीन वाहने बार्शी, दक्षिण सोलापूर, माळशिरस, अक्कलकोट, माढा, करमाळा आणि पंढरपूर या सात तालुक्यांना देण्यात आली आहेत. या नव्या वाहनांचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज