मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्या प्रकरणी सुभाष शिंदे ( रा . शिवगंगा नगर , सोलापूर ) यांच्यासह पाच जणांची अतिरिक्त सत्र न्यायाधीश डि . के अनभुले यांनी निर्दोष मुक्तता केली.
याबाबत अंबुबाई कदम ( रा . शिवगंगा नगर ) यांच्या फिर्यादीनुसार कदम या घरी मुलाबाळांसह बसलेले असताना पूर्व वैमनस्यातून सुभाष शिंदे यांनी जातिवाचक शिवीगाळ करून लाकडाने मारहाण केली . त्यानुसार सुभाष शिंदे यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
न्यायालयांमध्ये या खटल्याची सुनावणी झाली . प्रथम खबरी मध्ये जातीवाचक शिवीगाळ केल्याबद्दल कोणताही आरोप नाही , यातील आरोपींनी फिर्यादीच्या मुला विरूद्ध केस दाखल केली होती . त्याला शह देण्यासाठी फिर्यादीने या गुन्ह्यात गुंतवले आहे , असा युक्तिवाद आरोपी पक्षाच्यावतीने करण्यात आला.
या युक्तिवादानंतर न्यायालयाने सुभाष शिंदे सह पाच जणांची निर्दोष मुक्तता केली . या खटल्यात आरोपीतर्फे अॅड . धनंजय माने , अॅड . भगवान वैद्य , अॅड . जयदीप माने , अॅड . विकास मोठे यांनी तर सरकारतर्फे अॅड . गंगाधर रामपुरे यांनी काम पाहिले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज