मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा
मंगळवेढा तालुक्यातील एका ग्रामीण भागात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी रामकृष्ण जमखंडी व महादेव मडुर (रा.मारोळी ता.मंगळवेढा) यांच्याविरुद्ध मंगळवेढा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 7588214814
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, दिनांक २७ ऑक्टोंबर रोजी रात्री ७.३० च्या सुमारास यातील फिर्यादी स्वच्छलयाला गेले असताना फिर्यादीस मम्मी मम्मी असा आवाज घराकडून आल्याने तेथे जाऊन बॅटरीने उजेडात पाहिले असता.
घरासमोर अंगणात बसलेले वरील आरोपी यांनी मुलीचे तोंड दाबून तिला ओढत नेऊन घराच्या पाठीमागे अंधारात खाली पाडून तिच्या अंगावर बसला व फिर्यादीचा गळा दाबून दुसऱ्या हाताने मुलीच्या अंगावर बसून लज्जावाटेल असे कृत्य केल्याप्रकरणी आरोपींविरुद्ध भा.द.वि कलम ३५४ व बाल लैंगिक कायदा ८,१२,४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश विधाते हे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज