मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
तीस जानेवारीच्या रात्री कुंभारी हद्दीत पडलेल्या शैलेश सुरेश घोंगडे या युवकाचा त्याच्या वडिलांनी सुपारी देऊन हत्या घडवण्याचा प्रकार वळसंग पोलिसांनी उघडकीस आणला आहे़ याप्रकरणी मारुतीच्या सुपारी बहाद्दर बापा सह चार जणांना ताब्यात घेण्यात आले़ शुक्रवारी पहाटे त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयत शैलेश घोंगडे हा विक्षिप्त स्वभावाचा होता तो रोज दारू प्यायचा घरी येऊन आई-वडिलांसह सर्वच कुटुंबियांना नेहमी त्रास द्यायचा त्याच्या त्रासाला कंटाळून जन्मदात्या बापाने शैलेशचा कायमचा काटा काढण्याचा निर्णय घेतला, त्यासाठी त्याने जवळच्या गावातील दोन तरुणांना सुपारी दिली आणि याचा खून करवला अशी माहिती समोर आली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज