मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा तालुक्यातील सलगर(बु)मधील अनुराधा बिराजदार ऑनर किंलीग प्रकरणातील अनुराधाचा पती श्रीशैलचा मृतदेह आज सलगर मध्येच आढळल्याने खळबळ उडाली असून ही आत्महत्या की हत्या? याचा तपास पोलीस करीत आहेत.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 7588214814
मंगळवेढ्यात ऑक्टोबर महिन्यात सालगड्याच्या मुलाशी लग्न केल्याने पोटची मुलगी अनुराधा बिराजदारला विष पाजून हत्या केली होती. अनुराधावर पहाटेच आई वडीलानी अंत्यसंस्कार करून टाकले होते. या घटनेने सोलापूर जिल्हयात हळ हळ व्यक्त केली जात होती. यानंतर पोलीसानी वडील विठ्ठल आई श्रीदेवी याना अटक केली होती. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
यानंतर अनुराधाचा पती श्रीशैल आणि त्याच्या वडीलानी एस.पी ऑफीस सोलापूर येथे जाऊन आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रास दिली होती. तसेच अनुराधाच्या आई वडील आणि इतर मारेकऱ्याना शिक्षा करण्याची मागणी केली होती.
आज सकाळी अनुराधाचा पती श्रीशैल बिरादारचा मृतदेह सलगर गावात अनुराधाचे ज्या शेतात अंत्यसंस्कार झाले होते तिथेच आढळला आहे. मृतदेह आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. श्रीशैल ने आत्महत्या केली की कुणी त्याची हत्या करून मृतदेह तिथे टाकला याबाबत तर्क वितर्क सुरू आहेत.
मंगळवेढा पोलीसांचे पथक घटनास्थळी पोहचले असून तपास सुरू आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज