मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । चंद्रभागा नदीत पोहण्यास गेलेल्या एका तरूणाचा शुक्रवारी दुपारी पाण्यात बुडून मृत्यू झाला . तर एकाचा जीव वाचण्यात स्थानिकांना यश आले . ऋषिकेश प्रीतम माने ( वय १९ , रा . कडबेगल्ली , पंढरपूर ) असे मृताचे नाव आहे . शुक्रवारी ऋषिकेश मित्रासोबत भीमा नदीपात्रातील बंधाऱ्याजवळ पोहण्यास गेला होता.
दरम्यान , पोहतान पाण्याचा अंदाज न आल्याने खोल खड्ड्यात बुडून त्याचा मृत्यू झाला , तर आणखी एक तरूण बुडता बुडता वाचवला . चंद्रभागा नदीपात्रातून सध्या मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू आहे . वाळू उशामुळे नदीपात्रात मोठमोठे खड्डे पडले आहेत . नदीपात्रातील या खड्डांत बुडून मृत्यूमुखी पडणाऱ्या भाविकांची संख्या वाढू लागली आहे . आठ दिवसांपूर्वीच नांदेड येथील विनोद गायकवाड या भाविकाचा चंद्रभागा नदीत स्नानासाठी गेल्यानंतर खोल खड्डयात बुडून मृत्यू झाला होता . त्यानंतर आज पुन्हा चंद्रभागा नदीपात्रातील खड्डांनी शहरातील एका निष्पाप तरूणाचा बळी घेतला आहे . या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज