मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
कोल्हापूर येथील सोळांकूर ता. राधानगरी येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक वर्ग१चे डॉ. सुनील कुरुंदवाडे लाचलुचपतच्या जाळ्यात सापडले. त्यांना ३० हजारांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी सोळांकूर ग्रामीण रुग्णालयातून अटक करण्यात आली.
याप्रकरणी मिळालेली माहिती अशी, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानचे (एनआरएच) डॉ. राजेंद्र इंगवले व इतर दोन डॉक्टर, स्टाफ यांच्या परफॉर्मन्स, वेतनवाढ रिपोर्ट कोल्हापूर सिव्हिल सर्जन यांच्याकडे पाठवण्यासाठी डॉ कुरुंदवाडे यांनी ३५ हजारांची मागणी केली. मात्र हा व्यवहार चर्चेअंती ३० हजारांवर ठरला. या व्यवहारात पंटर सुहास टिक्केकर (रा.कोल्हापूर) याचाही समावेश आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागानचे उप अधिक्षक डॉ. आदिनाथ बुधवंत, पोलिस निरीक्षक युवराज सरनोबत, ए. एस. आय मनोहर कणगावकर, पोलिस नाईक मनोज खोत, शरद पोरे, विकास माने, रुपेश माने, शैलेश पोरे यांच्या पथकाने केली आहे. तर पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कर्मचारी करत आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज