मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । आर्थिकदृष्ट्या सक्षम असतानाही आपल्या मुलाचा विवाह नोंदणी पद्धतीने केला. मात्र विवाहासाठी लागणारा सर्व खर्च देशसेवा करताना शहीद झालेल्या सैनिकांच्या पाल्यांना उच्च शिक्षणासाठी देण्याचा निर्णय घेऊन समाजसेवेचा आगळा वेगळा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.
विशेष म्हणजे पालकांसह दोन्ही वर- वधू उच्चशिक्षित असून दोघेही मुंबई येथे मोठ्या पदावर कार्यरत आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील गुजर समाजातील या अनोख्या विवाह सोहळ्याची चर्चा होत आहे.
शहादा (मुळ गाव शिरूड दिगर, ता.शहादा) येथील वीज वितरण कंपनीतील सेवानिवृत अभियंता विपीन देविदास पाटील यांचा एकुलता एक मुलगा मनिष याचे लग्न मुंबई (मुळ गाव भरवाडे, ता. शिरपूर) येथील डॉ. अजय नरोतम पाटील यांची कन्या वृषाली हिच्याशी रितीरिवाजानुसार जमला.
परिवाराच्या संमतीने लग्नाची तारीख निश्चित करण्यात आली. मात्र विवाह हा नोंदणी पद्धतीने व्हावा अशी विनंती मनीषने माता-पिता व होणाऱ्या सासू-सासऱ्यांना केली. तसेच विवाहसाठी लागणारा सर्व खर्च हा देशाच्या सेवेसाठी शहीद झालेल्या सैनिकांच्या मूलांच्या उच्च शिक्षणासाठी करावयाचा असल्याचा मानस व्यक्त केला. मनिषच्या अनोख्या मागणीला नववधू वृषालीसह दोन्ही परिवाराने संमती दिली. हा विवाह सोहळा 11 मार्चला नंदुरबार येथील रजिस्टर कार्यालयात पार पडला.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज