मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सोमवारी विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदी निवड करण्यात आली . सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सोमवारी कामकाज सुरु होताच पवार यांच्या नावाची घोषणा केली .
याआधी शिवसेनेचे नेते सुभाष देसाई हे विधानपरिषदेचे सभागृह नेते होते . २०२० मध्ये विधानपरिषदेतील काही सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे . जून २०२० मध्ये राज्यपाल नियुक्त १२ आमदार महाविकास आघाडीतर्फे निवडले जातील . मागच्या पाच वर्षात विधान परिषदेतील भाजपची सदस्य संख्या वाढलेली आहे . त्यामुळे विधानपरिषदेत सरकारची बाजू भक्कमपणे मांडणारा नेत्याची आवश्यकता होती .
सुभाष देसाई हे मवाळ नेते म्हणून ओळखले जातात . त्यांच्या उलट अजित पवार हे स्पष्टवक्ते आणि आक्रमक म्हणून ओळखले जातात .
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज