मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लक्ष्मीनगर (कचरेवाडी) येथे शनिवार दिनांक 22 फेब्रुवारी रोजी रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजीराव काळुंगे सर, कचरेवाडी गावचे सरपंच हनमंत कोळेकर, उपसरपंच सिंधुताई शिंदे, माजी सरपंच मारुती काळुंगे, माजी मिस्टर सरपंच मच्छिंद्र भोसले, माजी चेअरमन महादेव आवताडे, दामाजी जाधव गुरुजी, तानाजी हजारे सर, केंद्रप्रमुख भिमाशंकर जतकर साहेब, दैनिक स्वाभिमानी छावाचे संपादक ज्ञानेश्वर (माऊली) भगरे, साप्ताहिक बळवंत ज्ञानचे संपादक महादेव वाघमारे शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य, पालक मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षिका बंधुभगिनी यांच्या प्रमुख उपस्थितीत लक्ष्मीनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा पंचविसावा रौप्यमहोत्सवी दिन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी सर्व उपस्थितांचे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुस्तक,गुलाब पुष्प, हार, शाल व चिक्कूचे रोप देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी डोंगरगाव केंद्रातील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेणारे शिक्षक बंधू भगिनी शाळेसाठी मोलाचे सहकार्य व मदत करणारे या सर्वांचा सत्कार करण्यात आला,
विशेष म्हणजे या शाळेतील माजी विद्यार्थी उपस्थित राहिले व त्यांचाही शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
तसेच या शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत व आई-वडिलांविषयी भाषण मोठ्या उत्साहाने गायन केले. श्री नवनाथ जाधव यांच्या वतीने भोजनाची व्यवस्था केली होती आलेल्या सर्व शिक्षक व ग्रामस्थ तसेच राजकीय मंडळींसाठी भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता, सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतला. त्यानंतर डिजिटल एलईडी द्वारे शाळेतील आज पर्यंत घेतलेले मोठे कार्यक्रम प्रमुखांना दाखविण्यात आले. तसेच शालेय व्यवस्थापन समितीने या कार्यक्रमासाठी मोठे श्रेय घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक उन्हाळे सर यांनी केले शेवटी सर्व उपस्थितांचे मुख्याध्यापक विठ्ठल ताटे यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शालेय परिसरातील सर्वांनी मोलाचे सहकार्य केले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज