मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
नातेवाईकातील एका मुलीचे फोटो व्हॉट्सपवर पाठविल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून लोखंडी रॉड आणि काठीने केलेल्या मारहाणीत रवि विठ्ठल राठोड ( वय – २१ ) आणि विकी राजू चव्हाण ( दोघे रा . बसवेश्वर नगर देगाव ) असे दोघेजण जखमी झाले .
ही घटना देगाव येथे सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली . या प्रकरणात ५ जणांविरुध्द खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली .
आनंद सायप्पा गायकवाड त्याचा भाऊ दयानंद , बाळू भानुदास गायकवाड त्याचा मुलगा अभिषेक आणि शेखर भानुदास गायकवाड ( सर्व रा . बसवेश्वरनगर , देगाव ता . उत्तर सोलापूर ) अशी आरोपींची नावे आहेत . शेखर गायकवाड याने रवि राठोड याच्या नातेवाईकातील एका मुलीचे फोटो मोबाईलवरून पाठविले होते . त्याचा जाब विचारण्यासाठी दोघे गेले असता पाच जणांनी मिळून लोखंडी रॉड आणि काठीने मारहाण करून खुनाचा प्रयत्न केला . यावेळी भांडण सोडविण्यासाठी रवि राठोड याची आत्या या मध्ये पडल्या होत्या .
आरोपींनी त्यांना देखील अर्वाच्च शिवीगाळ करून लाथाबुक्क्याने मारहाण केली . अशी नोंद सलगरवस्ती पोलिसात झाली आहे . महिला फौजदार सुतार पुढील तपास करीत आहेत .
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज