मंगळवेढा : समाधान फुगारे
सरकारी बँकांना आर्थिक आधार देउन त्यांना कार्यक्षम करण्याचा निर्णय स्वागतार्ह असून डिपॉझीट इन्शुरन्स अॅण्ड क्रेडिट गॅरन्टी कॉर्पोरेशन (DICGC) ची मर्यादा रुपये 1 लाखावरून रुपये 5 लाख करण्याचा निर्णय स्वागतार्ह असून त्यामुळे सर्व बँकांतील ठेवीदारांच्या ५ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना संरक्षण प्राप्त होणार आहे.
जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
त्यामुळे बँकांतील ठेवी वाढण्यास मदतच होईल. व विश्वासार्हता वाढण्यासही मदत होईल. सरकारी बँकांमध्ये नवीन कर्मचारी भरतीबाबत काही राष्ट्रीय पातळीवर भरती संस्था स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे तथापि सद्या कार्यरत असणाऱ्या आय बी पी एस या संस्थेचे काय होणार याचे सूतोवाच यामध्ये नाही.
परंतु राष्ट्रीय पातळीवर सर्व बँकांमधील भरतीसाठी एकच परीक्षा घेतली तर उमेदवारांना त्याचा फायदा होईल व सर्व बँकांना चांगले कर्मचारी देखील मिळतील. बँकांची परिस्थिती सुधारली आहे. असे मा. केंद्रीय अर्थमंत्री यांनी सांगितले. तथापी सरकारी बँकांमध्ये मोठ्या प्रमाणावर भागभांडवलाची गुंतवणूक करून त्या बँकांमार्फत बुडीत कर्जासाठी तरतूद झाल्याने परिस्थिती सुधारल्याचे चित्र दिसते आहे असे वाटते.
बँकांसाठी 3 लाख 50 हजार कोटींच्या निधीची घोषणा करण्यात आली आहे. याचा बँकांना आवश्यक भांडवली तरतूद करण्यासाठी व त्यांची अर्थक्षमता वाढवण्यासाठी उपयोग होईल व बँका साक्षमी होतील. मात्र याच धर्तीवर तळागाळातील जनतेला बँकींग सुविधा पुरविणार्या नागरी सहकारी बँकांसाठी काही निधीची तरतूद केलेली नाही तसेच इतर सहकारी बँक व पतसंस्थांनाही आधार देणारी तरतूद व्हायला हवी होती. सहकारी बँकाच्या कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव असून या बँकमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन आणण्यासाठी, कार्यक्षमता वाढवण्यासाठी तसेच स्पर्धात्मकता वाढाव्यासाठी प्रयत्न केले जातील असे दिसते .
प्रत्यक्षात असे झाले तर सहकारी बँकाही नव्या रूपात उभ्या राहोतील असे म्हणायला हरकत नाही . SARFAESI Act 2002 कायद्यातील सद्याची ५०० कोटी रुपये मालमत्तेची आत शिथिल करून ती २०० कोटी रु करण्यात आलेली असून या कायद्यासाठीची कर्ज मर्यादा १ कोटी रु वरून ५० लाख रु केली आहे याचा उपयोग बँकांची कर्जे वसूल होण्यासाठी होईल व थकबाकीची प्रमाण कमी होईल असे वाटते.
प्रा डॉ विजय कुंभार
विभाग प्रमुख, बँक मॅनेजमेंट विभाग
धनंजयराव गाडगीळ कॉलेज ऑफ कॉमर्स , सातारा
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज