मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोरोना विषाणूमुळे सर्वच स्तरावर मोठी खबरदारी घेतली जात असताना आता बुधवार पेठेत चालणारा वेश्याव्यवसायही बंद राहणार आहे. तिथं येणाऱ्या लोकांना सध्या प्रतिबंध करण्यात येत आहे.
कोरोना विषाणूमुळे जगभरासह भारतात चितेंचं वातावरण आहे. राज्य सरकार या विषाणूला थोपवण्यासाठी योग्य ती खबरदारी घेत आहे. या विषाणूचा धसका वेश्या व्यवसाय करणाऱ्यांनीही घेतला आहे.
पुण्यातील बुधवार पेठेतील काही भागात वेश्या व्यवसाय चालतो. बुधवार पेठ म्हटलं की अनेकांच्या डोळ्यापुढे हाच भाग येतो. मात्र कोरोनामुळे या भागातील व्यवसायही बंद राहणार आहे.दरम्यान, राज्य सरकारनं खासगी कंपन्यांना शक्य असेल तर वर्क फ्राॅम होमच्या सूचना दिल्या आहेत.
तसेच कमीत कमी कर्मचाऱ्यांमध्ये सरकारी काम करता येईल का? याची चाचपणी सुरु असल्याचं म्हटलं आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज