मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शेगांव ( ता . अक्कलकोट ) येथे गुढीपाडव्याच्या दिवशी होणारे ग्रामदैवत श्री लायव्वा देवी यात्रा रद्द करण्यात आली आहे , अशी माहिती यात्रा कमिटीने दिली आहे.
मंगळवार दि . २५ मार्च रोजी तैलाभिषक , बुधवारी दि . २५ मार्च रोजी पालखी मिरवणुक , कलगीतुरा तर गुरुवारी दि . २६ मार्च रोजी कुस्ती आणि सामाजिक नाटक रद्द करण्यात आला आहे . सध्या जगभरात कोराना विषाणूने थैमान घातला आहे . हा विषाणू संसर्गजन्य असल्याने भाविकांच्या सुरक्षेसाठी आणि एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी यात्रा कमिटीने एक बैठक घेऊन गुढीपाडव्याच्या दिवशी होणारे यात्रा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला.
यात्रेला दरवर्षी मुंबई , पुणे , बेंगलोर , गुलबर्गा , विजयपूरसह अन्य भागातून भाविक दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात येत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे . तसेच पुणे , मुंबई वरून गावात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांवर लक्ष ठेवून योग्य ती सल्लाही दिले जात आहे . तसेच भाविकांच्या दर्शनासाठी ३१ मार्च पर्यंत मंदिरही बंद ठेवण्यात आला आहे , तरी परगावाहन भाविकांनी दर्शनासाठी गर्दी करू नये असे आवाहन ही यात्रा कमिटींनी केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज