मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
वारंवार सांगूनही मतदार पडताळणी मोहिमेत सहभाग न नोंदविलेल्या ७८० बीएलओंना ( मतदान केंद्र अधिकारी / बुल लेव्हल ऑफिसर ) कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती निवडणुक उपजिल्हाधिकारी स्नेहल भोसले यांनी दिली .
निवडणूक आयोगाने ११ नोव्हेंबर ते १३ फेब्रुवारी यादरम्यान मतदार पडताळणी कार्यक्रम राबविण्याच्या सूचना जिल्हा निवडणूक कार्यालयांना दिल्या होत्या . या मोहिमेत मतदार पडताळणी , मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण , प्रमाणीकरण आदी कामे पार पाडण्यात येणार आहेत .
पण जिल्ह्यातील बहुसंख्य शिक्षकांनी या कामावर बहिष्कार टाकला . त्यामुळे निवडणूक कार्यालयास ही मोहीम पूर्ण करता आलेली नाही .
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज