mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

आमदारसाहेब ‘या’ प्रश्नांची सुध्दांची उत्तरे द्याल का ? माऊली हळणवर

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
आमदारसाहेब ‘या’ प्रश्नांची सुध्दांची उत्तरे द्याल का ? माऊली हळणवर



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । मंगळवेढा-पंढरपूर आमदार साहेब यांनी नुकतेच प्रसिध्दीपत्रक प्रसिध्दीस देवून पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्यासह त्यांच्या बदलीविषयी प्रश्न उपस्थित करणाऱ्या समाजसेवकांवर अनेक गंभीर आरोप आपण केलेले आहेत. यामुळे माझ्यासह तमाम नागरिकांच्या मनात खालील प्रश्न उपस्थित होत आहेत. 

1) पंढरपूर शहरात अवैध धंदे, वाळू उपसा, खाजगी सावकारी, खंडणी वसूली चालू होती ? असा प्रश्न आपण उपस्थित केला. याबाबत यापुर्वी आपण कधीही आवाज उठविला नाही ? छोट्या-मोठ्या कारणासाठी आपण नेहमीच विधानसभेत प्रश्न उपस्थित करीत असता मग एवढ्या गंभीर प्रश्नावर या अगोदर आपण का बोलला नाही आपण मुग गिळून का गप्प बसलात ?

2) महिलांच्या सुरक्षेविषयी, मुलींच्या छेडछाडीविषयी आपण कधी रस्त्यावर उतरून आंदोलन केलेले किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दिल्याचे दिसून आले नाही.

3) बंदुकीचा धाक दाखवून लुबाडल्याचे व्हीडीओ फुटेज आपल्याजवळ उपलब्ध आहेत असे आपण म्हटलेले आहे. मग यावर आपण कधी का आवाज उठविला नाही.

4) आमदार साहेब आपण समाजसेवकांवर आरोप करत आहात, परंतू आपल्याच गाडीमध्ये फिरणारा व आपले सर्व कामकाज पाहणारा अत्यंत जवळचा वाळू तस्करीचे बक्कळ गुन्हे दाखल असलेला आपला कार्यकर्ता गुन्हे करीत असताना आपण इतरांवर चिखलफेक करणे चुकीचे आहे.

5) पंढरपूर शहरातील एका व्यक्तीवर गांजा विक्री करीत असलेबाबतची कारवाई कोल्हापूर पोलीसांनी पंढरपुरात येवून केल्याचे आपण सांगितले मात्र त्यावर आपण कधी आवाज उठविला नाही ते आत्ताच कसे काय सुचले ?

6) सागोंलामधुन माजी आमदार गणपतआबा देशमुख आणी दिपक आबा साळुंखे यानीं बोलावुन घेऊन पो.नि.दयानंद गावडे यांच्याकडून अर्ज लिहुन घेतला आणि त्यांना सोलापुरला का पाठवलं ?  ते संपूर्ण  सांगोला तालुक्याला महित आहे. उलट मला हे सिंघम भेटायला आल्यावर मी लगेच पंढरपूरसाठी शिफारस दिली असे सांगितले मग आताच त्यांच्यावर आरोप करण्याची वेळ आपल्यावर का आली ?  

7) ज्यांची बदली झाली त्यांच्या कार्यकाळात शहरात अवैध धंदे वाढले होते, कायदा सुव्यवस्था धोक्यात आली होती असे आपण म्हणालात त्यावर आपण का आवाज उठविला नाही आपण गप्प का बसला ? याचा खुलासा करावा.

8) राष्ट्रपुरुषांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यास परवानगी देतानाही दुजाभाव केला जात होता असे आपण प्रसिध्दी पत्रकाद्वारे म्हटलेले आहे पण असे कुठल्याही समाज बांधवांने आजपर्यंत म्हटलेले नाही व आम्ही ऐकीवात नाही. मग आपण याबाबत शांत का बसला ?

9) सामान्य जनतेला सिंघमच्या बदलीचे दुःख नाही तर त्यांनी पोसलेल्या विकाऊ समाज सेवकांना कळवळा आलेला आहे असा आरोप आपण केला मात्र आपण पोसलेले वाळूमाफीया, खाजगी सावकार यांच्यावर कारवाई करू नका असे आपल्याच गाडीत फिरणाऱ्या आपल्या जिवलग कार्यकर्त्याचे  मोबाईल रेकॉर्डींग तपासणे आवश्यक आहे. ते करण्याचे धाडस आपण दाखवाल का ?

10) आमदारसाहेब आपण प्रशासकीय बदली झाली असे पत्रक काढले असता सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी वृत्तपत्रात जाहीर खुलासा करून बदली झाली नसल्याचे सांगितलेले आहे. यावर आपण खुलासा कराल का ?

11) पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील सर्व शासकीय ऑफीसला प्रत्येक महिन्याला आपला जिवलग कार्यकर्ता (सुस्तेचा) कशासाठी जातो ? तो कशासाठी फोन लावून देतो ? याचा खुलासा आपण कराल का ?

12) पंढरपूर तालुक्यातील सरकोली, अजनसोंड, मुंढेवाडी येथील वाळू उपसा करणारे यादी आपण जाहीर कराल का ?

या प्रश्नांची उत्तरे आपण श्री विठ्ठलाला साक्षी ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर द्याल जनतेला द्याल का ? असा प्रश्न बळीराजा शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माऊली हळणवर यांनी उपस्थित केला आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsSolapurराजकीय

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
गावी निघालेल्या महिलेला चालत्या गाडीत बलात्कार

गावी निघालेल्या महिलेला चालत्या गाडीत बलात्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजमाता अर्बन बँक रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; दामाजी चौकात बँकेची 24 तास ATM सेवा सुरू

मंगळवेढ्यात ‘राजमाता बँकेचा’ उद्या वर्धापनदिन; गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चहापानाचे आयोजन

March 18, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

​पोलिसांचा आशीर्वाद की यंत्रणेचा सुस्तपणा? गुन्हा दाखल असलेले ‘ते’ १० विद्यार्थी अजूनही मोकाटच; मनसेचा पोलीस महानिरीक्षकांना सवाल

March 18, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

मंगळवेढा हादरलं! चाकूचा धाक दाखवून भरवस्तीत घरफोडी; सव्वा लाखांचा मुद्देमाल लंपास; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

March 18, 2026
दक्षिण भागात म्हैसाळचे पाणी “टेल टू हेड” मिळणेसाठी आ.आवताडे यांची विधानसभेत मागणी; देवेंद्र फडणवीस यांचे सकारात्मक उत्तर

नदी वाचवा, निधी द्या! भीमेच्या शुद्धीकरणासाठी १०० कोटी द्या; आमदार आवताडेंची सरकारकडे आग्रही मागणी; विधानसभेत घुमवला आवाज

March 17, 2026
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

मोठी बातमी! ​गरीबांच्या हक्काच्या पैशावर डल्ला; लाचखोर ग्रामपंचायत कर्मचारी अटकेत

March 17, 2026
कामाची बातमी! मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया उपचार सुरू

मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त भव्य आरोग्य शिबीर: मोफत तपासणी आणि उपचारांची सुवर्णसंधी

March 17, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा