मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । शतपावली करत असताना एका महिलेच्या गळ्यातील सोन्याच्या गंठणसह सोन्याची चैन पळवून नेल्याची घटना विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की , फिर्यादी प्रभा ज्ञानेश्वर कदम ( वय – ४१ ) रा . जुना संतोष नगर , गणपती मंदिर शेजारी , जुळे सोलापूर या व त्यांचा मुलगा घरापासून काही अंतरावर जेवणानंतर शतपावली करत होते . त्यावेळी पाठीमागून आलेल्या दचाकीवर बसलेल्या दोघांपैकी मागे असलेल्या अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या गळ्यातील तीस हजार रुपये किमतीचे १२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण व वीस हजार रुपये किमतीची सोन्याची चैन असे मिळून एकूण ५० हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून चोरून नेला.
ही घटना दि . १९ फेब्रुवारी २०२० रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास जुळे सोलापूर येथे घडली . या घटनेची नोंद विजापूर नाका पोलीस ठाण्यात झाली असून , अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या घटनेचा पुढील तपास पोसई . मस्के हे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज