मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
ट्रॅक्टरने समोरून धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला . मधुकर जगन्नाथ भोसले ( वय ४२ , रा . चिंचोली , ता . सांगोला ) असे अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे .
हा अपघात रविवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास सांगोला – शिरभावी रस्त्यावरील चिंचोली हायस्कूलजवळ घडला . मधुकर जगन्नाथ भोसले हे दुचाकीवरून धायटीकडे जात होते . त्या वेळी समोरून येणाऱ्या ट्रॅक्टर ( एमएच ४५ – एफ २७८५ ) चालकाने भोसले यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली .
या अपघातात भोसले यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला . दुचाकीचे अंदाजे पाच हजार रुपयांचे नुकसान झाले आहे . सीताराम भोसले यांनी अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध सांगोला पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे . वसगडे तपास करीत आहेत .
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज