मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
जमीनीवरील कर आकारणी प्रकरणी अभिप्राय देण्यासाठी ५० हजाराची लाच घेणाऱ्या मनपा विधान सल्लागाराला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही . पी . आव्हाड यांनी दिला .
अरूण नागनाथ सोनटक्के ( वय ४० , रा . दहिटणे ) असे आरोपी विधान सल्लागाराचे नाव आहे . अरुण सोनटक्केला लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला शुक्रवार दि . २४ जानेवारी रोजी पकडले होते . त्याला आज सोमवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश आव्हाड यांच्या न्यायालयात त्याला उभे केले असता ,
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी आणखी दोन दिवसाची पोलीस कोठडीची मागणी केली परंतु न्यालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला . या प्रकरणी सरकारच्या वतीने अॅड . अहमद काझी यांनी तर आरोपीच्या वतीने अॅड मिलिंद थोबडे , अॅड . विनोद सुर्यवंशी यांनी काम पाहिले .
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज