मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
आपण अनेकदा मैत्र-मैत्रिणी, आंतरजातीय युवक युवती पळून जाण्याच्या घटना ऐकत असतो मात्र, आपल्या वयापेक्षा 12 वर्षाने लहान असलेल्या भाच्यासोबत मामी पळूनगेल्याची घटना खदानच्या हद्दीत घडली आहे. हा सर्व प्रकार लपवणे शक्य नसल्याने नातेवाईकांनी पोलिस ठाणे गाठले होते. या प्रकरणाची चांगलीच चर्चा सुरू आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून मामी आणि भाच्याचे संबंध असल्याची कुणकुण नातेवाईकांत होती. यापूर्वी एकदा असाच प्रकार उघडकीस आला होता.
मात्र पुन्हा एकदा भाचा स्वत:च्या मामीलाच घेवून पळून गेला आहे. नातेवाईकांनी या दोघांचाही शोध घेतला मात्र त्यांचा थांगपत्ता नाही. आता हे दोघे सापडतच नाही म्हणून हैराण झालेल्या नातेवाईकांनी त्यात युवताची आई, त्याचा मामा व आजी या सर्वांनी मिळून पोलिसांची पायरी चढली आहे.
विशेष म्हणजे पळून गेलेल्या मामीला 12 व 13 वर्षाची दोन मुले आहेत. कसलाच विचार न करता या दोघांनी संसार थाटण्याचा घेतलेला निर्णय मात्र नातेसंबंधाला काळीमा फासणार आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज