मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । सोलापूर जिल्ह्यातून 1 वर्षाकरिता हद्दपार केले असताना विनापरवाना सांगोला शहरात प्रवेश केलेल्या तडीपार आरोपीस पोलिस कर्मचारी ताब्यात घेण्यासाठी गेले असता पोलिसांना त्याने धक्काबुक्की करून पळून गेल्याची घटना घडली.
तडीपार विजय बबन केदार (रा. वासुद, ता. सांगोला) असे त्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध सांगोला पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 6 मार्च) दुपारी 1.30 च्या सुमारास पंढरपूर रोडवरील फॅबटेक कॉलेजनजीक घडली.
वासुद (ता. सांगोला) येथील विजय बबन केदार यास उपविभागीय दंडाधिकारी मंगळवेढा यांच्या कार्यालयाकडून 1 वर्षाकरिता सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार केलेले आहे.
पोलिसांनी त्यास पकडण्याचा प्रयत्न केला असता धक्काबुक्की करून तो सांगोल्याच्या दिशेने पळून गेला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला, मात्र तो सापडला नाही. याबाबत सरकारतर्फे पो. कॉ. सिध्दनाथ अर्जुन शिंदे यांनी फिर्याद दाखल केली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज