मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । करोनामुळे घाबरण्याची गरज नाही. सरकारतर्फे खबरदारीसुद्धा घेतली आहे. मात्र त्याचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गर्दीत जाणे टाळणे आवश्यक आहे. याच कारणामुळे आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्याचा विचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
आयपीएल स्पर्धेत देश-विदेशातील खेळाडूंचा सहभाग असतो. देशातील सर्वच प्रमुख राज्यांमध्ये सामने बघण्यासाठी प्रेक्षकांची प्रचंड गर्दी होते. संभाव्य धोका टाळण्यासाठी सामने रद्द करणे आवश्यक आहे. गर्दीच्या कार्यक्रमांना टाळावे असे सरकारतर्फे आवाहन करण्यात आले. त्यामुळे आयपीएल सामनेही रद्द करण्याचा विचार सुरू आहे. याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियमाक मंडळासोबत चर्चा करून घेतला जाईल.
नागपूरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर विदेशी फ्लाईट मधून येणाऱ्या प्रवाशांची आरोग्य तपासणी केली जात आहे. सर्व शासकीय रुग्णालयात कोरोना संदर्भात वॉर्ड आणि डॉक्टरांची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोना व्हायरस संदर्भात आशा वर्कर्सना 11 ते 13 मार्च दरम्यान ट्रेनिंग दिले जाणार आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज