Mangalwedha Times:-
शिरोळ तालुक्यातील आलास येथे बाप व मुलाच्या झालेल्या भांडणात बापाने खुरप्याने मुलाच्या मानेवर पाठीवर वार केल्याने मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील आलास गावात बापानेच मुलाचा खून केल्याची घटना घडली मयत राजू व संशयित आरोपी बाबू मुरासे बाप मुलगा असून या दोघानाही दारूचे व्यसन होते.
शनिवारी रात्री दहाच्या सुमारास मुलगा राजूने वडिलाकडे दारू पिण्यासाठी पैशाची मागणी केला .यावेळी दोघांमध्ये वादावादी होऊन बाबूने रागाच्या भरात मुलगा राजूच्या मानेवर व पाठीवर खुरप्याने वार केला. खुरप्याचा वार वर्मी लागल्याने राजूचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी कुरुदवाड पोलिस अधिक तपास करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज