मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
सोलापूर जिल्ह्यातील एकूण जमिनी, मिळकती, गावठाण आणि हद्दी कायम करण्यासाठी शासनाच्या वतीने ड्रोनद्वारे मोजणी होणार आहे. त्यासाठी सर्व्हे ऑफ इंडियाद्वारे लवकरच काम सुरू होणार आहे. तत्पूर्वी भूमिअभिलेख कार्यालयाच्या वतीने उत्तर सोलापूर तालुक्यातील सर्वच गावांत गावठाण निश्चिती करण्यात आली आहे. जवळपास 233 गावांमध्ये ही गावठाण निश्चिती कर्मचार्यांद्वारे पूर्ण करण्यात आल्याची माहिती जिल्हा भूमिअभिलेख अधिकारी हेमंत सानप यांनी दिली आहे.
सध्या मिळकतींचा आणि हद्दीचे वाद वाढले आहेत. शासकीय जमिनीवर अतिक्रमणेही वाढली आहेत. अनेक ठिकाणी पडिक जमिनी, शासकीय जमिनी लाटण्याचा प्रकार वाढला आहे.
जानेवारीअखेर हे ड्रोन सोलापूरला येणे अपेक्षित होते; मात्र अद्याप ते आलेले नाही. त्यामुळे ही माहिती संकलित करण्याचे काम रखडले असल्याची माहिती विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील शहर सोडून जवळपास 833 गावांची माहिती ड्रोनद्वारे संकलित करण्यात येणार आहे.
गाव नकाशे आणि मालकी होणार कायम
आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असलेले या ड्रोनची जवळपास 28 लाख रुपये किंमत असून त्यामध्ये संपूर्ण माहिती संकलित करण्यात येणार आहे. उपलब्ध झालेल्या माहितीनुसार त्याचे नकाशे तयार करण्यात येणार आहेत तसेच मिळकतीची मालकी, त्याच्या हद्दीही कायम करण्यात येणार आहेत. अचूक माहिती शासन दरबारी उपलब्ध होणार आहे. हद्दी कायम झाल्याने शेतकर्यांमध्ये असलेले वादही कायमस्वरुपी मिटणार आहेत. शासनाच्या जमिनीही कायम राहणार असल्याची माहिती भूमिअभिलेख कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज