मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोरोना विषाणूबाबत गैरसमज पसरविणारी माहिती कोणत्याही माध्यमातून प्रसारित केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिला आहे.
यासंदर्भात पोलीस आयुक्तांनी सुधारित आदेश काढले आहेत . संचारबंदी कालावधीत लिखित , डिजिटल मीडियामध्ये छपाई करुन किंवा तोंडी मजकूर प्रसारित करेल किंवा चित्र छापेल , ज्यामुळे लोकांमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतो , अफवा पसरविल्या जाऊ शकतात अशा कृत्यास बंदी घालण्यात आली आहे . या बंदी आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती , संस्था अथवा संघटना भारतीय दंड संहिता ( ४५ ऑफ १८६० ) कलम १८८ मधील तरतुदीनुसार दंडनीय / कायदेशीर कारवाईस पात्र ठरेल . अशा व्यक्ती , संस्था अथवा संघटना यांच्याविरुध्द संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकाऱ्यांनी कारवाई करावी , असे आदेशात नमूद केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज