
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
रेल्वे स्टेशनजवळ मोबाइल हिसकावणारा चोरटा सदर बझार पोलिसांच्या जाळ्यात आला आहे. गणेश चंद्रकांत जाधव (रा. सेटलमेंट कॉलनी, सोलापूर) याला अटक करण्यात आल्याची माहिती फौजदार अल्ताफ शेख यांनी दिली. रेल्वे स्टेशन जवळील हॉटेल विश्व समोरून एक जण मोबाइलवर बोलत थांबला होता. तेव्हा पाठीमागून आलेल्या तीन दुचाकीस्वार तरुणांनी त्यांच्या जवळील दोन मोबाइल हिसका मारून पळून गेले होते.
गुन्हा करताना काही नागरिकांनी दुचाकीचा नंबर पाहिला होता. त्यावरून पोलिस शोध घेत होते. चोरीस गेलेला मोबाइल संशयित गणेश जाधव याच्याकडे असल्याची माहिती मिळाली होती. दोन दिवस पोलिस त्याच्या मागावर होते.
आज त्याला जेरबंद केल्याचे सांगण्यात आले. ही कारवाई फौजदार शेख, हवालदार गणेश कानडे, बडूरे या पथकाने केली. चोरीस गेलेले दोन्ही मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. आणखी दोघांची नावे निष्पन्न झाली असून त्यांचाही शोध सुरू आहे.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












