mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

संस्मरणीय व ऐतिहासिक पुस्तकात नोंद करावी असे मंगळवेढयाचे राज्यस्तरीय साहित्य संगीत संमेलन आहे. डॉ.द.ता.भोसले

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
संस्मरणीय व ऐतिहासिक पुस्तकात नोंद करावी असे मंगळवेढयाचे राज्यस्तरीय साहित्य संगीत संमेलन आहे. डॉ.द.ता.भोसले



महाराष्ट्रामध्ये साहित्य व संगीत ही  दोन्ही संमेलने एकाच वेळी केव्हाच झालेली नाहीत. मंगळवेढ्यामध्ये  आयोजित करण्यात आलेले राज्यस्तरीय साहित्य-संगीत संमेलन  उल्लेखनीय असून ते संस्मरणीय व ऐतिहासिक पुस्तकात नोंद करावी असे संमेलन असल्याचे गौरवोदगार   ज्येष्ठ साहित्यिक व संयुक्त संमेलनाचे अध्यक्ष डॉ. द.ता. भोसले यांनी काढले.



सुरसंगम ग्रुप,महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे,शाखा दामाजीनगर,नाट्य परिषद मुंबई शाखा मंगळवेढा,यांचे संयुक्त विदयमाने आयोजीत राज्यस्तरीय साहित्य संगीत संमेलन उदघाटन प्रसंगी अध्यक्षीय स्थानावरून ते बोलत होते. 

संमेलनाचे उदघाटन ज्येष्ठ साहित्यिक डॉ.इंदूमती जोंधळे यांचे हस्ते करण्यात आले.



व्यासपीठावर माजी मंत्री प्रा.लक्ष्मणराव ढोबळे,युटोपियन शुगर्सचे चेअरमन उमेश परिचारक,स्वागताध्यक्षा अरुणा माळी,मसाप शाखा पुणेचे कार्यवाह प्रकाश पायगुडे,कोषाध्यक्षा सुनिताराजे पवार,कार्यकारी सदस्य पद्माकर कुलकर्णी,विभागीय सचिव कल्याण शिंदे,शिक्षण प्रसारक मंडळाच्या माजी अध्यक्षा डॉ. मिनाक्षी कदम, जि.प.समाजकल्याण समिती सभापती शिला शिवशरण,युटोपियन शुगर्सचे कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील,यशोदा पतसंस्थेच्या चेअरमन निला अटकळे,जि.प.सदस्या मंजुळा कोळेकर,नगरसेवक अजित जगताप,संयोजन समितीचे प्रकाश जडे,दिगंबर भगरे,डॉ.शरद शिर्के,यतिराज वाकळे,लहू ढगे आदी उपस्थित होते.

              

डॉ. द.ता.भोसले म्हणाले, संस्कृतीचे दोन डोळे आहेत ,एक साहित्य व दुसरे संगीत. चैतन्याचा साकार अविष्कार म्हणजे साहित्य तर चैतन्याचा आविष्कार म्हणजे संगीत , साहित्य भूमीवर स्वर्ग निर्माण करते, तर संगीत स्वर्ग पृथ्वीवर  आणते, दर्जेदार साहित्य एकाच वेळी आनंद देते व अस्वस्थ ही करते .तालुक्यामध्ये प्रथमच राज्यस्तरीय संगीत साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे या भूमीमध्ये श्री बसवेश्वर ,श्री संत दामाजीपंत, श्री संत चोखोबा ,संत कान्होपात्रा अशा प्रकारचे थोर संत या भूमीत होऊन गेलेले आहेत त्यांचा वारसा सांगणारी हि भूमी आहे. स्त्रीची पाच रुपे आहेत,बालिका जी चांदणे पेरत असते,युवती जी उद्याचं जग जगते, पत्नी सावली बनते, आई सेवा व सदाचार शकवते तर आजी परमार्थ सांगते. अशा प्रकारे स्त्रीचे आपल्या जीवनात महत्त्व आहे .ज्या ठिकाणी स्त्रीचा आदर केला जात नाही त्या ठिकाणी घर पण नसते. माणसाला प्रशूत्वापासून देवतत्वाकडे नेण्याचे काम स्त्री करते. सत्य, शिव व सुंधरा यांचा संगम म्हणजे स्त्री.  ज्या ठिकाणी स्त्रीला प्रतिष्ठा नाही त्या ठिकाणी परमेश्वर कधीच पाऊल टाकत नाही. स्त्रीला समाजाने ओळखलेच नाही सात आंधळे व एक हत्ती अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. स्त्री म्हणजे खवा आहे ,आयुष्यभर खावा. बाई म्हणजे जीवनाचा अर्थ आहे तुझ्याविना जीवन व्यर्थ आहे .त्याचबरोबर स्त्रियांनी आज पर्यंत राष्ट्रपती, पंतप्रधान ,शासकीय क्षेत्र अशा विविध  क्षेत्रांमध्ये केलेल्या कामगिरी यांची माहिती सांगितली व शेवटी भ्रूणहत्या किती घातक आहे त्याची उदाहरणेही दिली.

              



डॉ.इंदुमती जोंधळे म्हणाल्या, साहित्यिक आपले विचार कथा ,कविता ,कादंबरी यातून मांडत असतो .वाचकांनी दिलेले प्रेम व प्रतिक्रिया त्या साहित्याला मिळालेली पोचपावती असते. पतीच्या आग्रहास्तव मी साहित्य वाचन केले .मला जे हवे ते साहित्य मला देण्यात आले. राष्ट्र सेवा दलात मी वाढलेली आहे .सर्व स्त्रिया महान आहेत. मी अनाथा आश्रमात वाढली आहे. यदुनाथ थत्ते म्हणाले गरुडाने आकाशात झेप घेतली म्हणून चिमणीने उघडायचं नसतं का? म्हणून मी चिमणी झाले व शब्द   चिंध्याच्या रूपाने सुंदर गोधडी साहित्यातून  मांडली आहे. अश्वस्थ श्वासाची डायरी ,या कथेतून मी माझ्या व्यथा मांडल्या. आश्रमातील 14 मुली विषयी लिहिले.  14 मुली म्हणजे म्हणजे माझी चौदा रत्ने आहेत. त्यांची नावे बदललेली आहेत त्यांच्या प्रत्यक्ष आयुष्यात कोणी दखल घेऊ नये व त्यांना बेदखल करू नये असं या पुस्तकातून दिलेले आहे.

                     

नदी डोंगरातून वाहत येते व शेवटी समुद्राला मिळते .प्रत्येकाचं जीवन अमृततुल्य करून जाते .तशाच प्रकारे स्त्री-पुरुषाला मिळते म्हणून बर्‍याच ठिकाणी बर्‍याच वेळी स्त्रियांना नदीची नावे दिलेली असतात .अर्धा आकाश स्त्रीचा आहे. त्यामध्ये मर्यादा घालू नका. स्त्री पुढे गेलेल्या आहेत. काही समीक्षक स्त्रीच्या बाबतीत हात आखडता घेत असत त्यावर शिंतोडे उडवतात. स्त्रियांनी आपल्या मुलींना डांबून ठेवू नये त्यांनाही स्वातंत्र्य द्यावे. स्त्रियांनाही माणूस म्हणून जगता आलं पाहिजे. स्वाभिमानाने उभे राहिले पाहिजे .जोपर्यंत ती उभे राहत नाही तोपर्यंत तिला समाजात किंमत नाही. नवीन लोकांना प्रोत्साहन दिले पाहिजे प्रत्येकजणी मध्ये चांगला गुण असतो तो विकसित करून दाखवा. आयुष्य खूप सुंदर आहे परंतु सर्व काही सोसावं लागतं .दोघांच्या कडून समानतेची वागणूक असेल तरच कुटुंब एकसंघ राहिल, कुटुंब एकसंघ एक संघ राहिले, तर समाज एकसंघ राहील आणि समाज एकसंघ राहिला तर राष्ट्र एकसंघ होईल.

             

प्रत्येक स्त्रीला समजून घेणे हे प्रत्येकाचे काम आहे. ज्या महिलांना मुला-मुलींचा शाळेतून आलेला चेहरा वाचतात येतो, तीच खरी आई असते. मुलगा रात्री बारा वाजेपर्यंत बाहेर फिरतो ,पण मुलीला मात्र सातच्या आत घरात अशी परिस्थिती निर्माण आपणच केलेली आहे .सध्या नवोदित कवीयत्री कितीतरी चांगल्या प्रकारे लिखाण साहित्यातून आपले विचार व्यक्त करत आहेत. त्यांचे विचार  आपण  ऐकून घ्यावे.वाचनाने बाहेर पाहण्याची दृष्टी मिळते . जे जे मंगल आहे ते सर्वांना मिळावे. पुढच्या पिढीसाठी पर्यावरण वाचवणे ही काळाची गरज आहे

                   

यावेळी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, उमेश परिचारक ,सुनीताराजे पवार, प्रकाश पायगुडे आदींनी आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रकाश जडे,सूत्रसंचालन राजेंद्रकुमार जाधव व बालाजी शिंदे यांनी केले तर आभार राकेश गायकवाड यांनी मानले.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
महाराष्ट्रातील मतदारांना मतपत्रिकेचा पर्याय मिळणार? विधानसभेच्या अध्यक्षांनी दिल्या महत्वाच्या सूचना

पोटनिवडणुकीची फेर मतमोजणी करा;शैला गोडसे, सचिन शिंदे, सिद्धेश्‍वर आवताडेसह राष्ट्रवादीची मागणी

May 17, 2021
Next Post
मंगळवेढ्यात अज्ञात कारणावरून एकाची हत्या;दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

मंगळवेढ्यात अज्ञात कारणावरून एकाची हत्या;दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांनो! मंगळवेढ्यात उद्यापासून “टॅली प्राईम जीएसटी”चे मोफत डेमो लेक्चर; सारा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचा उपक्रम

विद्यार्थ्यांनो! मंगळवेढ्यात संगणक कोर्स करा  आता फक्त 1900 मध्ये; सारा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटची खास ऑफर; 10 जुलैपासून नवीन बॅच सुरू; नावनोंदणीसाठी 9503706404 करा संपर्क

July 3, 2025
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

रतनचंद शहा सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता? १५ जागांसाठी ‘या’ उमेदवारांचे अर्ज झाले मंजूर

July 3, 2025
चिंता वाढली : मंगळवेढ्यात कोरोनाचा दहावा बळी; 35 वर्षीय महिलेचा मृत्यू

हृदयविकारामुळे मृत्यूचा ‘या’ लसीशी कोणताही संबंध नाही; अचानक ‘हार्ट ॲटॅक’ मागे अनेक कारणे; केंद्र सरकार दिले स्पष्टीकरण

July 3, 2025
धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घेऊन गावी परत जाताना वारकऱ्याने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन केली आत्महत्या

July 3, 2025
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

याद राखा..! शेतकऱ्यांना फसवणाऱ्या विमा कंपन्यांवर सरकार करणार आता ‘ही’ कडक कारवाई; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंची घोषणा

July 3, 2025
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

सायबरतज्ज्ञांनी भर सभागृहात सोलापूर जिल्ह्यात अधिकाऱ्याचा मोबाइल केला ‘हॅक’; दक्षता कशी जाणून घ्या…

July 2, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा