मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या परिसरात रात्री पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली आहे .
तीन दिवसांपूर्वीच या विद्यापीठाचे विद्यार्थी निदर्शने करीत असताना गोळीबार झाला होता . विद्यापीठाच्या पाचव्या क्रमांकाच्या प्रवेशद्वाराजवळ रविवारी रात्री गोळीबार झाला .
स्कूटीवरून आलेल्या दोघांनी हवेत गोळीबार करून पळ काढला , असे स्थानिकांनी सांगितले . गोळीबाराच्या या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही . हल्लेखोर लाल रंगाच्या स्कूटीवरून आले होते , असे जामिया समन्वय समितीकडून सांगण्यात आले आहे .
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज