मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा शहरातील तुकाईनगर मध्ये चोरट्याने धुमाकूळ घालून घरांना बाहेरून कडी घालून लोकांना कोंडून चोरी करण्याचा प्रकार केला असून जागरूक नागरिकांनी पोलीस स्टेशनला फोन केल्याने चोरट्यांचा डाव फसला पण चोरट्यांनी पुन्हा ग्रामीण भागात जाऊन चोरी करण्याचा सफाटा लावला आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 7588214814
याबाबत सविस्तर माहिती अशी की,शनिवारी पहाटे दोन शिक्षकांच्या घरांना चोरट्यांनी बाहेरून कड्या लावल्या, कड्या लावत असताना एकाने पाहिले व त्यांनी त्या शिक्षकांना फोन केला तुमच्या घरी चोर आले असून बाहेरून कडी लावून तुम्हाला कोंडले आहे.असे सांगितले
त्यानंतर त्यांनी मंगळवेढा पोलिसांशी संपर्क साधला. सायरन वाजत गाडी आल्याने चोरटे अंधाराचा फायदा घेऊन पळाले पोलिसांच्या गाडीचा आवाज ऐकून अख्खा परिसर जागा झाला. ६ चोरटे असल्याचे सांगण्यात आले या चोरट्यांनी आपला मोर्चा लक्ष्मी दहिवडी गावाकडे वळवला पहाटेच्या दरम्यान शिवाजी मारुती आधाटे यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील रक्कम व सोन्याचे दागिने असा 57 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला तसेच फिर्यादीच्या घराच्या पाठीमागे राहणारे उमेश बनसोडे,भगवान कुंभार आयुब तांबोळी यांच्या घराचे कुलूप तोडून मुद्देमाल चोरून नेला आहे.
थंडीचे दिवस असून नागरिक उबदार ठिकाणी गाढ झोपतात त्याचा फायदा घेऊन चोऱ्या होत आहेत. तसेच मंगळवेढा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे चोरट्यांनी धुमाकूळ घालण्यास प्रारंभ केला आहे.नव्याने कार्यभार स्वीकारलेले पोलीस निरीक्षक अनिल गाडे यांनी ग्रामस्थांची बैठक घेऊन ग्रामसुरक्षा दल तयार करून गावाचे संरक्षण करावे अशी मागणी जनतेतून होत आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज