मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । सोलापूर शहर हद्दीतील एमआयडीसी ठाण्याच्या हद्दीत ११ ठिकाणी घरफोडी करणाऱ्या दोन चोरांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.सागर विकास राठोड ( वय २२ , रा . मुळेगाव , लमाण तांडा , ता . दक्षिण सोलापूर ), लालू उर्फ सागर भोजू राठोड ( वय ३२ , रा . आशा नगर , एमआयडीसी , अक्कलकोट रोड ) अशी अटक केलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून टी . व्ही . , गॅस , सोने चांदीचे दागिने असे एकूण २ लाख २२ हजार रुपयांचे ऐवज हस्तगत केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की , एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील जुने विडी घरकूल परिसरातील राजेश पायलट चौक येथील इंडीकॅश कंपनीचे एटीएम मंगळवार १७ मार्च रोजी अज्ञात चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला होता . याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला होता.
याचा तपास करताना पोलीस नाईक फुटाणे , शिंदे , गुरव यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली . या गुन्ह्यातील आरोपी सागर विकास राठोड हा गोंधळे वस्ती येथील चिकन दुकानात येणार असल्याची माहिती मिळाली . त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.
याचबरोबर आशानगर येथून सागर भोजू राठोड यालाही ताब्यात घेतले . या दोन्ही आरोपींची चौकशी केली असता आपण गुन्हे केल्याचे त्यांनी कबूल केले . त्यांच्याकडून ७३ . ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने , १९ . ३ तोळे चांदीचे दागिने , ५ एलईडी टी . व्ही . , ८ गॅस टाक्या असे एकूण २लाख २२ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज