मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत सोन्याच्या आयातीत ६ . ७७ टक्क्यांची घट होऊन , ती २३ अब्ज डॉलर्सवर आली आहे . सोन्याची आयात कमी झाल्यास चालू खात्यातील तूट कमी होण्यास मदत होणार आहे .
वाणिज्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार , मागील आर्थिक वर्षामध्ये ( २०१८ १९ ) सोन्याची आयात २४ . ७३ अब्ज डॉलर्सवर पोहोचली होती . चालू आर्थिक वर्षात जुलैम ध्ये सोन्याच्या आयातीत घसरण नोंदविण्यात आली होती . गेल्या वर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये सोन्याच्या आयातीत वाढ नोंदविण्यात आली होती . त्यानंतर डिसेंबरमध्ये ४ टक्क्यांची घसरण नोंदविण्यात आली .
भारतात वर्षभरात अंदाजे ८०० ते ९०० टन सोन्याची आयात केली जाते . सोन्याच्या आयातीमुळे चालू खात्यावर पडणारा नकारात्मक प्रभाव कमी करण्यासठी धातूवरील आयात शुल्क १० टक्क्यांनी वाढवून १२ . ५ टक्के करण्यात आले होते . या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या म ते , सोन्यावरील आयातशुल्क वाढविण्याच्या निर्णयामुळे बड्या कंपन्यांनी आपले दागिने निर्मितीचे केंद्र शेजारी देशांमध्ये नेण्यास सुरुवात केली आहे . ‘ जीजेईपीसी ‘ माहितीनुसार संबंधित उद्योगांनी आयातशुल्क घटवून ४ टक्क्यांवर आणण्याची विनंती केली आहे .
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज